Type Here to Get Search Results !

ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचा नांदुरा येथील देशमुख कुटुंबातील बालमावळ्यांचा प्रयत्न*

 *ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचा नांदुरा येथील देशमुख  कुटुंबातील बालमावळ्यांचा प्रयत्न*



 नांदुरा : सध्या शाळांना दिवाळी सणाच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे नांदुरा येथील देशमुख कुटुंबातील अर्णव, आरूही, अद्वीक व सवंगडी यांनी सुट्ट्यांचा उपयोग करीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि जगभरातील अनेकांचे स्फुर्ती स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेला शिवनेरी किल्ला साकारला आहे. किल्ल्याची प्रतिकृती बनविणे हे केवळ कलेचे प्रतीक नाही तर ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचा सुद्धा या बालमाआवळ्यांचा प्रयत्न आहे. अर्णव देशमुख, आरूही देशमुख, अद्विक देशमुख व त्यांची मित्रमंडळी दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किंवा शिवजयंतीला किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारतात. या वर्षी सुद्धा त्यांनी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती बनविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यांनी दगड, विटा, माती, कापड, कागद,  नैसर्गिक रंग, कामठी यांचा वापर करून सुरेख असा किल्ला साकारला आहे. किल्ल्यावर महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, शिवाई देवीचे मंदिर, लेण्या, बदामी तलाव, गंगा व यमुना टाकं, अंबारखाना, धान्याचे कोठार, कोळी चौथरा, पाण्याच्या टाक्या, यांसह शिवरायांचा जन्म ज्या वास्तूत झाला ती शिवजन्म स्थळाची वास्तू साकारण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. किल्ल्यावरील मावळे, तोफा, भाले, स्वराज्याचा भगवा ध्वज असलेले झेंडे लक्ष वेधून घेतात. कुटुंबीयांच्या मार्गदर्शनात आणि इंटर नेट व  पुस्तकांमधून मिळविलेल्या माहितीच्या आधारे बालमावळ्यांनी उत्कृष्ट असा किल्ला साकारल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे व किल्ल्या पाहण्यासाठी सुद्धा लहान थोर उत्सुक असल्याचे दिसते.

Post a Comment

0 Comments