*मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आ.चंद्रकांत पाटील हे दुसऱ्यांदा विजयी*
संदीप घाईट
मुक्ताईनगर दि.२३(प्रतिनिधी)संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेना(शिंदे गटाचे)उमेदवार तथा विद्यमान आ.चंद्रकांत पाटील हे झालेल्या निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.त्यांना एकुण 112318 मते मिळाली आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)पक्षाच्या उमेदवार ॲड.रोहिणी खडसे ह्या 88414 एवढी मत घेवून दुसऱ्या स्थानी राहिल्या.तसेच अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले विनोद सोनवणे यांना 2332 इतकी,मनसेचे अनिल गंगतिरे यांना 972 तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्राम्हणे यांना 5471 एवढी मत मिळाली आहेत.आमदार चंद्रकांत पाटील हे 23904 मताधिक्य घेवून विजयी झाले आहेत.

Post a Comment
0 Comments