Type Here to Get Search Results !

परभणी येथील भारतीय संविधान शिल्पाची विटंबना व भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅंथर सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जन आक्रोश आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे करण्यात आले..*


 *(राजु घाटे बुलढाणा)।                  परभणी येथील भारतीय संविधान शिल्पाची विटंबना व भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ ऑल इंडिया पॅंथर सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जन आक्रोश आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे करण्यात आले..* 



ऑल इंडिया पॅंथर सेना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे संघटनेच्या जिल्हा पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये जनॉक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. 

सदर मोर्च्याची सुरुवात संघटनेचे जिल्हा पदाधिकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली 

१) परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील भारतीय संविधान शिल्पाची विटंबना प्रकरणातील आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे. 

२) पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणाऱ्यां गुन्हेगारांवर व सूत्रधारावर कठोर कारवाई व्हावी 

३) आंदोलन भीम सैनिकांचे चाललेले अवैधरीत्या कोंबिन ऑपरेशन त्वरित थांबवावे व त्यांच्यावरील केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी. 

अशा अनेक मागण्यासह ऑल इंडिया पॅंथर सेना बुलढाणा जिल्ह्याच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब कार्यालय बुलढाणा यांना निवेदन सादर करतेवेळी जिल्हा पदाधिकारी प्रल्हाद भाई कोलते, विजय भाई वानखेडे, प्रज्ञावंत भाई तायडे, प्रशांत भाई तायडे, विलास भाई तायडे, अमोल भाई शेगोकार, आकाश भाई हिवाळे, किशोर भाई सरकटे, विजय भाई जुबंळे, तसेच तालुका पदाधिकारी संजयभाई पवार, भाऊजी भाई कोलते, संगम तायडे, देवदास भाई तायडे अंकुश भाई इंगळे, त प्रकाश मेढे, अक्षय वानखेडे, अप्पू सय्यद, मोहन लहाने, भारत कदम,महिला आघाडी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments