Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र पोलिसांना दर महिन्याला सेमिनार व प्रोग्राम घेऊन , लोकांशी चांगली मदतपूर्ण वागणूक करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग (Human Rights Court) चा ऐतिहासिक निर्णय


 महाराष्ट्र पोलिसांना दर महिन्याला सेमिनार व प्रोग्राम घेऊन , लोकांशी चांगली मदतपूर्ण वागणूक करण्याचे आदेश

महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग (Human Rights Court) चा ऐतिहासिक निर्णय


पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस नीट वागणुक देत नाही अशी सर्वसामान्यांची भिती आत्ता दुर होणार आहे, कारण डोंबिवलीतील एका युवकाने पोलीसाच्या असभ्य वागण्याबाबत राज्य मानवी हक्क आयोगाचे दरवाजे ठोठावल्यावर राज्य मानवी आयोगाने महाराष्ट्र पोलीसांना दर महीन्याला सेमिनार व प्रोगाम घेऊन लोकांशी चांगली व मदत पुर्ण वागणूक करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत. 

डोंबिवलीत रहाणारा केवल विकमणी हा तरुण क्रिकेटचे टर्फ़ ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात असलेल्या शिवाजीनगर पोलीस स्टॆशनच्या हददीत चालवित होता. दि. २० मे २०२३ रोजी त्यांच्या टर्फ़मध्ये क्रिकेटचा सामना सुरु असताना शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुहास विठठल पाटील ह्यांनी पोलीस गाडीने आपल्या कर्मचा-यासह येऊन केवल विकमणीसह सर्व खेळांडुना घाणेरडया भाषेत शिवीगाळ करत, मारहाण करुन २०० उठा-बशा मारण्यास लावलेल्या होत्या, त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरलदेखील झाला होता. त्यापुर्वीदेखील केवल विकमणी ह्यांना मारहाण करुन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाहीदेखील करण्यात आलेली होती, 

हफ़्ता न दिल्यामुळे मारहाण करुन चुकीची वागणूक दिली म्हणुन केवल विकमणी ह्यांनी शासनाच्या विविध विभागाकडे तक्रारी केलेल्या होत्या, त्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे केवल विकमणी ह्यांनी अधिवक्ता गणेश घोलप यांचेमार्फ़त राज्य मानवी ह्क्क आयोगाकडे तक्रार केलेली होती. त्या तक्रारीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तासह उल्हासनरचे डीसीपी व अंबरनाथचे एसीपी यांचेसह समर्थ पोलीस स्टेशन, पुणे येथे नियुक्तीस असलेले पोलीस उपनिरीक्षक सुहास विठठ्ल पाटील ह्यांना नोटीस काढुन शपथपत्र सादर करण्याचे निर्देश केलेले होते. सुनावणी दरम्यान राज्य मानवी हक्क आयोगाने व्हिडीओ चित्रीकरण, सुहास पाटील यांचेविरोधात झालेली कार्यवाही आदींचे अवलोकन करुन पोलीस उपनिरीक्षक सुहास विठठल पाटील ह्यांनी ६ आठवडयात केवल विकमणी ह्यांना ५ लाख रुपये नुकसान भरपाईपोटी देत त्यांचेविरोधात भादवि कलम ४४८ व इतर नुसार गुन्हा नोंदविण्याचे, तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करत त्यांचेविरोधात दोषारोपपत्र सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना देत महाराष्ट्र पोलीसांना दर महीन्याला सेमिनार व प्रोगाम घेऊन लोकांशी चांगली व मदत पुर्ण वागणूक करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकाना दिलेले आहेत.


सदर विषयाची समाजात जागरूकता पसरविण्यासाठी  गंभीर पणे दखल घ्यावी ही नम्र विनंती

*महाराष्ट्र दर्शन न्युज महाराष्ट्र सल्लागार सुरजभैय्या यादव खामगांव*

Post a Comment

0 Comments