Type Here to Get Search Results !

मकरसंक्रांति निमित्त हळदी-कुंकु हा उत्सव महिलांसाठी राबविण्यात येतो. मात्र यात विधवा महिलांचाही सहभाग असावा

 नांदुरा 


: मकरसंक्रांति निमित्त  हळदी-कुंकु हा उत्सव महिलांसाठी राबविण्यात येतो. मात्र यात विधवा महिलांचाही सहभाग असावा



. त्या विधवा झाल्या यात त्यांचा दोष काय? असा सवाल करत माझ्या विनंतीवर चिंचोलकर परिवाराच्या वतीने आयोजित या हळदी-कुंकवाच्या उत्सवात सुवासिनींसोबतच विधवा महिलांना आमंत्रित करून त्यांनी जगासमोर एक आदर्श मांडला आहे. त्यांच्या या कृतीतून प्रेरणा घेत प्रत्येक महिलेने आपल्या घरी हळदी-कुकुचा उत्सव राबवितांना सुवासिनींसोबतच विधवा महिलांना आमंत्रित करा, असे आवाहन  जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा, जनक्रांती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष इंजि.कोमलाताई सचिन तायडे यांनी केले.

संस्कृती सिलेक्शन नांदुराच्या संचालिका सौ.अर्चनाताई शैलेश चिंचोलकर यांनी हळदी-कुंकु समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना इंजि.कोमलताई तायडे यांनी उपस्थित सर्व महिलांना संबोधित करतांना सांगितले की, काही दिवसांपुर्वी झालेल्या कार्यक्रमात मी हळदी-कुंकु समारंभात विधवा महिलांचा सहभाग असावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद सत्यपाल महाराज यांचे वंशज असलेल्या चिंचोलकर परिवाराने त्यांच्या या कार्यक्रमात सुवासिनींसोबतच विधवा महिलांनाही आमंत्रित करून आपल्या सर्वांसमोर एक आदर्श प्रस्थापिक करून आपण सर्वांनी हा आदर्श घेत आगामी काळात विधवा महिलांना सर्वच प्रकारच्या सण उत्सवात सहभागी करून घ्या, असे आवाहन इंजि.कोमलताई तायडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments