राष्ट्रीय कुंभार महासंघ व खादी ग्रामोद्योग आयोग नागपुर ह्यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत
दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी पासुन सुरु असलेल्या कुंभारकला प्रशिक्षण शाळेचा समारोपीय कार्यक्रम व समाजातील समाज भुषण मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रमाचे उदघाटन खामगांव जिल्हा भाजपाचे सरचिटणीस मा.श्री शरदचंद्र गायकी ह्यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महासंघाचे कार्याध्यक्ष सुभाष तेटवार हे होते. **समाजातील जेष्ठ नेते श्री रामदास नावकर,गजानन नावकर ह्यांना समाज भुषण पुरस्कारानेसन्मानीत करण्यात आले** **तसेच कुंभार समाजाला वेळोवेळी मदत करणारे नेहमी सावली प्रमाणे सोबत असणारे शरदचंद्र गायकी,मा.विजयभाऊ भालतडक व अरविंद इंगळे ह्यांना समाज भुषण पुरस्काराने सन्माणित करण्यात आले**प्रमुख मार्गदर्शक खादी आयोगाचे अधिकारी श्री शशीकांत सरसांडे,भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ भालतडक,सरचिटणीस अरविंद इंगळे , कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष ad. राजीव मंगळवेढे,कार्याध्यक्ष गणेश मोरे,सरचिटणीस रामेश्वर कापडे,महिला आघाडी सरचिटणीस सौ ज्योताई बावस्कार ,नांदुरा तालुका अध्यक्ष विजय इंगळे,गजानन तायडे,सुभाष लाहुडकार ,बावस्कार, मोरे राजेन्द्र रोतळे,गोपाल गजानन रोतळे ,बनचरे असे संपुर्ण जिल्ह्यातुन 60 विद्युत चाक लाभार्थि , समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.तज्ञ प्रशिक्षक म्हणुन विकास मालधे भंडारा हे हजर होते.दिनांक 21-01-2025 पासुन 29-01-2025 पर्यत कुंभार कलेचे अद्यवत प्रशिक्षण दहा दिवस खामगांव येथे चालले .उदघाटनपर भाषण करताना शरदचंद्र गायकी ह्यांनी समाजाच्या समस्या सरकारच्या माध्यमातुन सोडवण्यांचे आश्वासन दिले.भविष्यात कुंभारकलेला चांगले दिवस येणार आहेत.असे सांगितले. विजयभाऊ भालतडक ह्यांनी मंत्री महोदयातर्फे समाजाच्या सर्वच समस्यावर आपण सर्व मिळुन जिद्यीने प्रयत्न करुन समस्या सोडवु मी कायम सावलीप्रमाणे समाजासोबत आहे.असे सांगीतले.कुंभार समाजाचे नेते ,राष्ट्रीय कुंभार महासंघाचे कार्याध्यक्ष सुभाष तेटवार ह्यांनी संघटनेचे,कलेचे महत्व विशद करुन आम्ही समाजाचे देणे लागतो म्हणुन असे समाजोपयोगी कार्यक्रम मोठ्या कष्टातुन आयोजीत करतो असे सांगीतले.समाजाने संघटीत राहावे असे आवाहन केले. **कार्यक्रम यशस्वी व्हावा ह्यांसाठी गेल्या महिनाभरापासुन प्रयत्न करणारे श्री गणेश मोरे जिल्हा कार्याध्यक्ष ह्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला** **श्री रामेश्वर कापडे ह्यांचाही ह्याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला**कार्यक्रमाचे प्रभावी व उत्तम असे संचालन करणारे विपरीत परीस्थितत सुद्धा समाज काम करणारे,लग्न संबंध जोडण्यासाठी कायम प्रयत्न करणारे रविन्द्र टाके ह्यांचाही सन्मान जिल्हाध्यक्ष मंगळवेढे ह्यांनी केला.आभार प्रदर्शन समाजाचे चिखली तालुका अध्यक्ष श्री गजानन नावकर ह्यांनी केले.

Post a Comment
0 Comments