*पवित्र हज यात्रेसाठी रवाना*
मोताळा तालुक्यातील कोथळी
येथून मुस्लिमांचे पवित्र तीर्थ स्थान असलेले मक्का मदिना उमराह (हज) यात्रेसाठी
कोथळी गावातील आदील शाह मुसा शाह , हे सहपत्नी व गावातीलच शेख इस्माईल शेख इब्राहिम व त्यांची पत्नी दि .१० फेब्रुवारी २०२५ च्या रात्री ८:३० मिनिटं च्या सुमारास गावातून हज यात्रेसाठी रवाना झाले
प्रथम ते क्रुझर वाहनाने मुंबई विमानतळावर पोहोचतील
व तेथून ते काल विमानाने मक्का मदिना साठी प्रस्थान करतील
आयुष्यात प्रत्येकाने एक वेळेस हज करावे हे प्रत्येक मुस्लिम बांधवांची इच्छा, असते पवित्र तीर्थस्थळ मक्का मदीना यांचे तवाफ करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो आयुष्यभर सत्य मार्गाने कमावलेला पैसा जमा करत असतो
व त्या पैशाचा उपयोग हज यात्रेसाठी करतो हज हे मुस्लिम समाजातील प्रत्येक व्यक्तीवर फर्ज अनिवार्य आहे
व या यात्रेसाठी जात असताना
गावातील असंख्य मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात त्यांना भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी जमलेले होते
त्यात गावातील पंचायत समिती सदस्य रफिक शेठ पोलीस पाटील ज्ञानेश्वर भारसाकडे शफी शां मुसा शा शेख अनिस शेख करामत
इमरान शाह हुसेन शाह
पत्रकार शेख अफसर शेख अकबर
व यांच्यासह इतर ग्रामस्थ हजर होते

Post a Comment
0 Comments