*आज खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे आगामी सण- उत्साहाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक उत्सवाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आणि डीजे मालकांची घेण्यात आली मीटिंग, शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते बहुसंख्येने होते उपस्थितआज दि. 12/08/2025 रोजी 11/30 ते 12/45 वा. पावेतो मा. उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव श्री प्रदीप पाटील.यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स्टे.खामगाव शहर खामगाव ग्रामीण, शिवाजीनगर हिवरखेड,पिंपळगाव राजा, यांच्या हद्दीतील आगामी गणेशोत्सव संदर्भाने मंडळाचे पदाधिकारी सदस्य तसेच कावड यात्रा मंडळाचे पदाधिकारी सदस्य व डी.जे.चे चालक-मालक यांची पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे मीटिंग घेण्यात आली. सदर मीटिंगमध्ये कोणीही मंडळामध्ये डी. जे. लावणार नाही. जर कोणी कर्कश आवाजात डीजे लावल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणीही मिरवणुकीमध्ये मध्य प्राशन करून नाचणार नाही. मंडळामध्ये कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असे आक्षेपर्ह गाणे वाजणार याची सर्वांनी काळजी घ्यावी. प्रत्येक मंडळाने आपापल्या मंडळामध्ये सी.सी. टी.व्ही. कॅमेरे लावण्याची व्यवस्थ करावी. कोणत्याही मंडळांनी आपल्या मंडळामध्ये मिरवणुकी दरम्यान अश्लील कृत्य करणारे नृत्य आणू नये. सर्व मंडळांनी गणपती परवानगी फॉर्म लवकर भरण्याबाबत सूचित केले. तसेच मंडळामध्ये कोणीही आक्षेपार्ह बॅनर लावू नये. सर्व मंडळांनी आपापली मिरवणूक शांततेने पार पाडावी व पोलिसांना सहकार्य करावे. अशा प्रकारच्या सूचना देऊन वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. सदर मिटींगला मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील, पो. नि. श्री रामकृष्ण पवार पो. स्टे. खामगाव शहर, पो. नि. श्री सुरेंद्र अहेरकर पो. स्टे. शिवाजीनगर, पो. नि. श्री तावडे पो. स्टे. खामगाव ग्रामीण, सपोनि श्री चौधरी पो. स्टे. हिवरखेड, सपोनि श्री गुजर पो. स्टे. पि. राजा व मंडळाचे 150/175 पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
*आज खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे आगामी सण- उत्साहाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक उत्सवाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आणि डीजे मालकांची घेण्यात आली मीटिंग, शहर व ग्रामीण भागातील सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते बहुसंख्येने होते उपस्थित*
August 12, 2025
0

Post a Comment
0 Comments