खामगाव नगर परिषदेचा गलथान कारभार, घाटपुरी नाक्यावरील व्यापारी संकुलात कंबरऐवढे पाणी,परिसरातील दुकानांमध्ये पाणी घुसुन लाखो रुपयांचे नुकसान, सानंदांनी केली मुख्याधिकाऱ्यांची कानउघाडणी
खामगाव ः- शुक्रवार दि.29 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास खामगाव शहर व परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.त्यामुळे खामगाव शहरातील नागरीकांची तांराबळ उडाली.जोरदार पडलेल्या पावसामुळे घाटपुरी नाका परिसरात पुरपरिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. व्यापारी संकुलातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना फोन लावुन त्यांना घाटपुरी नाका परिसरातील माहिती सांगितली असता ते सांगतात की, नगर परिषदेमध्ये पाणी उपसा करण्याचे पंप नाही, पंप खराब झालेले आहे अशी उडावा-उडवीची उत्तरे माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांना दिले.त्यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये नगर परिषदेविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घाटपुरी नाका परिसरात जावुन सदर पावसाचे पाणी साचलेल्या व्यापारी संकुलातील दुकानांची पाहणी केली व याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा,उपविभागीय अधिकारी खामगाव व मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेचच कंत्राटदार यांच्या माध्यमातून सक्षण पंप बोलावुन दुकानातील पाणी उपासण्याला सुरुवात झाली. तद्नंतर जेसीबीच्या साहयाने तेथील जमा झालेले पाण्याची वाट मोकळी करण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यावेळेस संकुलामधील व्यापारी व दुकानदारांनी नगर परिषदेच्या गलथान कारभाराविरुध्द अनेक शिव्याशाप दिल्या व नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले अशी खंत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्याकडे व्यक्त केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, माजी नगरसेवक ओमप्रकाश शर्मा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रोहित राजपुत, सुरेंद्र पवार, सुनिल मानकर,अमित तायडे यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी त्वरीत नालीचे बांधकाम करा व नंतर दुसरे बांधकाम करा असे निर्देश नगर अभियंता मस्के व संबंधीत कंत्राटदारांचे प्रतिनिधी यांना दिले. जो पर्यंत नालीचे बांधकाम पुर्ण होणार नाही तो पर्यंत रस्त्याचे काम करु देणार नाही असा इशारा या परिसरातील माजी नगरसेवक ओम शर्मा यांनी दिला व या परिसरात मागील 17 दिवसापासुन सणा सुदीच्या दिवसामध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ आले नसल्यामुळे नागरीकांनी रोष व्यक्त केला. रस्त्याचे काम होतांना अनेकवेळा पाईपलाईन फुटल्यामुळे नागरीकांना त्रास झाला. पोल व पाईपलाईन शिप्टींग या कामाअगोदर नाली बांधकाम करणे गरजेचे असतांना नियोजन शुन्य कारभारामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागला त्याबदद्ल सानंदा यांनी नगर परिषदेविरुध्द तीव्र रोष व्यक्त केला असुन या कृतीचा तीव्र निषेध केला आहे व नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहिल असा संवाद उपस्थितांशी साधला व पाणी साचलेल्या दुकानांमध्ये कमऱ्याऐवढया पाण्यामध्ये जावुन पाटील किराणा दुकानाची पाहणी केली.दोन तासाच्या पावसामुळे खामगाव शहराची व नागरीकांचे एवढे हाल होत असतील तर खरच खामगाव शहर वासीयांचा कोणी वाली नाही अश्या प्रतिक्रिया नागरीकांनी व्यक्त केल्या. नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळेच
तेथील दुकानदारांच्या दुकानामध्ये पाणी साचल्यामुळे त्यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनी केली.


Post a Comment
0 Comments