*कोथळी गावात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण*
*कोथळी* (शेख अफसर), दि. १३ ऑक्टोबर २०२५ प्राप्त माहितीनुसार
कोथळी येथील शेतकरी रमेश घोरपडे यांची इब्राहिमपूर शिवारात शेतजमीन आहे व त्याच शेतजमिनी बरोबर ते जोडधंदा व शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुधन गोधन व दुधाचा व्यवसाय करतात त्यासाठी त्यांनी शेतात गायींचा गोठा बांधला असून काल रात्री नेहमीप्रमाणे गोठ्यात ५ गायी व वासरूसह इतर जनावरे बंदिस्त स्वरूपात बांधलेली होती रात्री अचानक १२ ते १ वाजेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात घुसून एका गाईचे फळशा पाडल्या
सदर घटना संबंधित शेतकरी हे सकाळी शेतात गेले असता समजले त्यामुळे सदर शेतकऱ्याचे अंदाजे ५० ते ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली ग्रामीण भागात बिबट्याच्या मानव वस्ती येण्याच्या घटना व शेतकऱ्याचे पशु धनावर हल्ला करून फस्त करून ठार मारण्याच्या घटना वाढल्या आहे सध्या कापूस वेचणीचा हंगाम असून सकाळी रात्री बे रात्री शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे सदर घटनेमुळे शेतकरी व शेतमजुरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या
घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच, शिवाय संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वाढलेला मुक्त संचार चिंतेचे विषय बनले आहे
कारण एखाद्या वेळेस मानव व हिस्त्र प्राणी यांच्या अनुसूचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत
नाही वन्यप्राणी-मानव संघर्षाची समस्या पुन्हा समोर येऊ नये म्हणून बिबट्या व इतर हिस्त्र प्राणी सापळा रचून जेर बंद करण्यात यावा रमेश घोरपडे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी वन विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून योग्य तो अहवाल शासन व प्रशासन यांच्याकडे सादर करावा अशी मागणी रमेश घोरपडे, मारुती भुसारी, नारायण आमले ,वैभव आमले ,अमोल गवार ,गजानन बज्जर ,इमरान शह हुसेन शहा ,करीम खान शब्बीर खान, व इतर ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात केली जात

Post a Comment
0 Comments