*वाघजाळमध्ये गुटखा तस्करीचा पर्दाफाश; पोलिसांनी ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला*
*(मोताळा प्रतिनिधी शेखअफसर)* दिनांक , १ नोव्हेंबर : राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असतानाही मोताळा तालुक्यात त्याची अवैध विक्री आणि तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही. अशा पार्श्वभूमीवर बोरखेडी पोलिसांनी शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) रोजी सकाळी अंदाजे 11ते 12 वाजेच्या दरम्यान धाडसी कारवाई करीत वाघजाळ येथील दोन संशयितांकडून ८६ हजार ४२० रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला. यात ई-स्कूटी आणि विविध कंपन्यांचे गुटखा पॅकेट्सचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर-मोताळा रोडवरील सुप्रभात डेअरीजवळ गस्त घालत असताना प्रशांत सुभाष गाडेकर आणि आकाश गणेश गाडेकर (दोघे रा. वाघजाळ) यांना थांबवले. त्यांच्या ताब्यातील इलेक्ट्रिक स्कूटीची (किंमत ४० हजार) तपासणी केली असता, त्यात लपवलेले गुटखा आणि तंबाखूचे पाकिटे आढळले. जप्त मुद्देमालात २२ पाउच पॅक कंपनीचे १०१ सिल्ड पॅक (१८,८८७ रुपये), १०० सुगंधित तंबाखू पाकिटे (३,३३३ रुपये), ११० पान मसाला पाकिटे (२१,७८० रुपये) आणि ११० सुगंधित तंबाखू पाकिटे (२,४२० रुपये) असे एकूण ४६,४२० रुपयांचे प्रतिबंधित पदार्थ होते.साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांच्या पथकाने ही कारवाई केली. घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त नितीन नवलकार यांना देण्यात आली. नवलकार यांनी संशयितांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे मालाच्या खरेदीचे कोणतेही बिल किंवा कागदपत्रे नव्हती. तसेच, प्रतिबंधित पदार्थ कुठून आणले हेही सांगता आले नाही.बोरखेडी पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५, २२३ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलम २६(२)(१), २५(२)(५), २७(२)(१)(१), ३०(२) व ५९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
*गुटखा माफियांचा मोठे रॉकेट सक्रिय*
मोताळा तालुक्यात गुटख्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा आहे. शहर आणि ग्रामीण भागात सहज उपलब्ध होणाऱ्या या प्रतिबंधित पदार्थामागे मोठे माफिया कार्यरत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होतो. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईची गरज व्यक्त होत आहे. छोट्या विक्रेत्यांवर कारवाई होते, पण मुख्य पुरवठादार मात्र सुटत असल्याने गुटखा विक्रीचा धंदा बिनबोभाट सुरू आहे.ही कारवाई गुटखा तस्करांमध्ये खळबळ माजवणारी ठरली असून, तालुक्यातील अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आ

Post a Comment
0 Comments