"निमगाव येथील महात्मा फुले हायस्कूलची कलेमध्ये उत्तुंग भरारी
"
निमगाव.... सोपान पाटील का. संपादक
महाराष्ट्र राज्य एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 2025-26 च्या निकालामध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये महात्मा फुले हायस्कूल निमगाव चा 100/ टक्के निकाल घेऊन घवघवीत यश संपादन करून ऐतिहासिक कामगिरी केली.
एलिमेंटरी पहिल्या परीक्षेत एकूण 19 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये प्रावीण्य "A" श्रेणीमध्ये आदित्य संजय पवार, अथर्व पंढरी इंगळे, दृष्टी संजय काळे, नम्रता विजय वावगे, साक्षी विष्णू अवचार तर "B" या प्रावीण्यश्रेणीमध्ये हरीश निलेश चरखे तसेच प्राविण्य "C" श्रेणीमध्ये आर्यन संदीप भोपळे,वृषाली विवेक पाऊलझगडे, दुर्गा गोपाल ढोले, गौरी मनोज कुवारे, कबीर निलेश हेलोडे, कल्याणी कैलास ढोले, ओजस नितीन चरखे, प्राची सुनील डाबेराव, राधा श्रीकृष्ण काळे, स्नेहल राधेश्याम उकर्डे, सुहानी कडू इंगळे,वैष्णवी हिरामण इंगळे आणि वेदांत संतोष एकडे.
शासकीय इंटरमिजिएट दुसऱ्या परीक्षेमध्ये एकूण 11 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये "A" या उच्च प्राविण्यश्रेणीमध्ये भक्ती श्रीकृष्ण बोंबटकार, कुणाल राजेंद्र तायडे,पूजा अनंत कंटाळे, पूजा प्रमोद बुले, श्रावणी सोपान सावलकर,वैष्णवी ज्ञानदेव गिऱ्हे तर "B" या प्राविण्यश्रेणीमध्ये आचल अनंत तायडे, हरीश मंगेश गिऱ्हे तर "C" या श्रेणीमध्ये अक्षरा योगेश इंगळे, भावना संजय इंगळे व गौरी विजय जाणे सदर परीक्षेमध्ये शाळेतील कलाशिक्षक श्री एस. ए. इंगळे सर यांनी अतिरिक्त क्लास घेऊन मोलाचे मार्गदर्शन केले तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व दोन्ही परीक्षेमध्ये 100 / टक्के निकालामुळे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री एस एस गिऱ्हे भाऊसाहेब, संस्थेचे अध्यक्ष श्री. के. आर. इंगळे सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री एस एल सातव भाऊसाहेब, संस्थेचे सचिव प्राध्यापक श्री सुहासभाऊ वाघमारे सर, तथा संपूर्ण संस्थेचे संचालक मंडळ तसेच कलाशिक्षक एस. ए. इंगळे सर यांनी भरभरून विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदनचा वर्षाव केला. त्याचबरोबर पर्यवेक्षक श्री एस डी राठोड सर पर्यवेक्षिका कु. जे.एन. भोपळे मॅडम व शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे खूप कौतुक करून समाधान व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments