सर्वज्ञ ज्ञानपीठ मध्ये सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
स्त्री शिक्षणाच्या प्रणेते भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनांक 3 जानेवारी शनिवार रोजी सर्वज्ञ ज्ञानपीठ माटरगाव बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी द्वारकाई लर्निंग अकॅडमीच्या संस्थापक सौ रुचिता गायकी ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापिका ज्योतीताई जगताप यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले शिक्षिका सुनीताताई नागपुरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या आकर्षक अशा वेशभूषा साकारल्या व त्यामधून त्यांच्या शिक्षण प्रसाराचा प्रवास सादर केला प्रमुख पाहुणे रुचिता ताई गायकी यांनी प्रत्येक मुलीने महिलेने सावित्रीबाई फुले यांच्या अंगी असलेले जिद्द चिकाटी कणखरपणा असे गुण अंगी करावे असे प्रतिपादन केले . आयोजित स्पर्धेमध्ये यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शुभांगी राऊत यांनी तर आभार प्रदर्शन सुनीताताई नागपुरे यांनी केले शेवटी बेटी बचाओ बेटी पढाओ , बेटी है तो कल है , मुलगी वाचवा देश वाचवा असे नारे लावून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

Post a Comment
0 Comments