Type Here to Get Search Results !

मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा येथे *बाबासाहेब फडके व पुरणमलजी चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुऱ्हा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन*

 मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा येथे *बाबासाहेब फडके व पुरणमलजी चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त


कुऱ्हा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन* 

   (सुनिल जगताप मुक्ताईनगर जळगाव)                                   प.पू माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेतील अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल कुर्हा येथे दिवंगत स्व. बाबासाहेब अशोक फडके व स्व. पुरणमलजी चौधरी (भाईजी) यांच्या पुण्यतिथीनिमित्त प.पू माधव सदाशिव  गोळवलकर गुरुजी संस्थेच्या वतीने १३/०१/२०२५ मंगळवार रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ कुऱ्हा मुक्ताईनगर मलकापूर वडोदा परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.या आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह, इसिजी  इको टूडे हिमोग्लोबिन तपासणी, वजन उंची मापन, नेत्र तपासणी तसेच सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी करण्यात आली.डॉ. सिद्धेश्वर खांडे DM कार्डीयॉलॉजिस्ट डॉ. रिषभ पाटील  एम. डी. मेडिसिन 

डॉ. राजसूरज एम. डी. मेडिसिन डॉ. आदित्य पाटील एम. एस. जनरल सर्जन डॉ. पल्लवी शेंडगे एम. एस. गायनोकोलॉजिस्ट डॉ. कुणाल ढोबळे एम. एस. ऑर्थो श्री. रतनशेखर जैन मार्केटिंग विभाग प्रमुख विशाल शेजवळ जन संपर्क अधिकारी रितेश पाडोळे 2d इको टेक्नशियन

डिम्पल पाटील कॉम्पुटर ऑपरेटर परिचारिका (नर्सिंग)स्टाफ    अनुभवी डॉक्टर, आरोग्य सेवकांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक त्या सल्ल्यांसह औषधोपचार दिले.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रमोदजी शिवलकर सर उपाध्यक्ष डॉ.राजेंद्रजी फडके सचिव श्री भालचंद्रजी कुलकर्णी कोषाध्यक्ष प्रल्हादजी बढे श्री प्रभाकरजी सुशीर श्री दामू अण्णा सुरंगे श्री वासुदेवजी पाटील श्री सितारामजी टावरी श्री प्रकाशजी चौधरी श्री सुनीलजी चौधरी श्री निवृत्तीजी पाटील सौ गौरीताई फडके श्री अशोक भाऊ कांडेलकर( मा.जि प अध्यक्ष) प्राचार्य डॉ. पी.व्ही  पिंगळे सर श्री कोथळकर सर श्री घोगरे सर श्री जुनघरे सर श्री प्रकाश भोई श्री योगेश नेटके प्रा. सचिन जोशी प्रा मनोज वाघ श्री आनंद शर्मा संस्थेतील सर्व युनिट मधिल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संस्थेतील सदस्य उपस्थित होते संस्थेतील संचालकांनी  दिवंगतांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देत,समाजासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. “पुण्यतिथी ही केवळ स्मरणाची नव्हे तर सेवाभावी कार्याची प्रेरणा असते,” असे त्यांनी सांगितले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल स्व.अशोक फडके माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय स्व. लक्ष्मीनारायण चौधरी आश्रम शाळा यातील सर्व सदस्य, स्वयंसेवक तसेच वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. शिबिरामुळे गरीब व गरजू नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments