Type Here to Get Search Results !

किन्ही नाईक येथे महिलांतर्फे उत्साहात गो-पूजन; मकर संक्रांतीनिमित्त 'जगदंबा माता गोरक्षण'मध्ये विविध उपक्रम





 

किन्ही नाईक येथे महिलांतर्फे उत्साहात गो-पूजन; मकर संक्रांतीनिमित्त 'जगदंबा माता गोरक्षण'मध्ये विविध उपक्रम


उदयनगर/किन्ही नाईक:

मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर उदयनगर जवळील किन्ही नाईक येथील 'जगदंबा माता गोरक्षण सिद्ध पीठ' गोशाळेत भाविक महिलांनी गो-पूजन करून मोठ्या उत्साहात सण साजरा केला. 

डोंगरदऱ्यात वसलेल्या या निसर्गरम्य भूमीत गेल्या पाच वर्षांपासून गो-संवर्धनाचे पवित्र कार्य अविरत सुरू असून, यंदाही महिलांनी गोमातेला हिरवा चारा व तिळगुळ अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.


गो-उत्पादनांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,

या निमित्ताने गोशाळेत तयार करण्यात आलेल्या पंचगव्य व गोमय उत्पादनांचा विशेष स्टॉल लावण्यात आला होता. यामध्ये गोमय धूप, दीपक, शुभ-लाभ, राखी, गोमय किचन , जपमाळ यांसह आयुर्वेदिक शॅम्पू, लाल दंतमंजन, केसांचे तेल, पंचगव्य साबण, गोनाईल आणि गायत्री पिडांतक तेल अशा विविध वस्तूंची मोठी विक्री झाली.

 गोशाळेच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई कोकाटे यांच्या हस्ते उपस्थित महिलांना 'गोमय किचन' व 'पंचगव्य साबण' देऊन सणाचे वाण व तिळगुळ वाटप करण्यात आले.


गो-सेवेचे आध्यात्मिक महत्त्व

शास्त्रांनुसार मकर संक्रांतीला गो-सेवा करण्याचे विशेष महत्त्व आहे, याची माहिती यावेळी देण्यात आली:

 * ग्रहदोष निवारण: सूर्य उत्तरायण होत असताना गो-सेवा केल्याने सूर्य, शनि आणि इतर ग्रहपीडा शांत होतात.


 * लक्ष्मी कृपा: गोमातेला चारा दिल्याने व्यवसायात बरकत येते आणि घरात स्थिर लक्ष्मीचा वास होतो.


 * पुण्यप्राप्ती: गोशाळेत गोमातेची सेवा करणे हे अश्वमेध यज्ञासमान पुण्य देणारे मानले जाते.


 * पितृदोष शांती: तिळ हे पितरांचे प्रतीक असल्याने गोमातेला तिळगुळ दिल्यास पितृदोष दूर होऊन पूर्वज प्रसन्न होतात.


धन-समृद्धी, ग्रहबाधा निवारण आणि मोक्षप्राप्तीसाठी गो-सेवा हाच सर्वश्रेष्ठ मार्ग असल्याचे सांगत, जास्तीत जास्त नागरिकांनी गो-संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन गोशाळेतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments