पातुर्डा येथील कु कृष्णाली विनोद गवईची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड
शेगाव | निकालांच्या चढाओढीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली आहे. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील पी. एम. श्री.
जिल्हा परिषद हायस्कूलची पातुर्डा
विद्यार्थिनी कु. कृष्णाली विनोद गवई हिने नेत्रदीपक यश संपादन करून
जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव
(जि. बुलढाणा) येथील प्रवेशासाठी
कु कृष्णाली विनोद गवई
पात्र ठरली आहे. कृष्णाली पातुर्डा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत
शिकत होती. अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या नवोदय प्रवेश परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवले. तिला आता सहावीत प्रवेश मिळाला आहे.

Post a Comment
0 Comments