नांदुरा पोलीस डीबी पथकाची अवैध देशी दारु विक्रेत्यावर कारवाई
आज दिनांक 30/10/2024 रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार हे नांदुरा हद्दी मध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाण ➡️ जनता चौक येथे गजानन बळीराम रताड वय 56 वर्ष दुर्गा नगर नांदुरा ता. नांदुरा हा इसम अवैधरित्या विनापरवाना विक्री करण्याचे उद्देशाने एका थैलीमध्ये 90 एम एल मापाच्या 20 नग देशी दारू टॅंगो पंच च्या शिष्या थैली सह किमती 710/- रुपयाच्या जवळ बाळगताना मिळुन आला.
तरी सदर कार्यवाही नापोका राहुल ससाने पोका विनोद भोजने, सुनील सपकाळ, पॉका निंबुळकर यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments