Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांनो सावधान व्हा. जर आता आपण सावध नाही झालो तर येणारे दिवस भयंकर येतील

 माझ्या शेतकरी बंधूंनो येणारी विधानसभेची निवडणूक ही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजेआपल्या विदर्भामध्ये कोणताही मोठा उद्योग नाही आपली उपजीविका फक्त शेतीच्या भरवशावर असते आज शेतकऱ्याची परिस्थिती ना घर का ना घाट का अशी अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे आज सोयाबीन भाव 3000 ते 3500 रुपये पर्यंत आलेयामध्ये कोणत्याही शेतकऱ्याचा शेतीचा खर्च भरून निघत नाहीजर असेच शेतकऱ्याचे दिवस आले तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशा परिस्थितीत कोणताही शेतकरी कर्ज फेडू शकत नाही त्यामुळे जो कोणी शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करेल सोयाबीनला भाव देईल आणि दर्जेदार शाळा बनवेल एकांद मंदिर कमी बांधला तर चालेलपण विद्यार्थ्यांचे मंदिर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक विद्यार्थ्यांच्या चांगल्या शाळा ह्या झाल्याच पाहिजे मतदारांनो या गोष्टीचा विचार करा व मतदान करा कारण मतदान ही पर्व आहे हे पाच वर्षातून एकदाच येते त्यामुळे विचार करून मतदान करा मुलांच्या भविष्यासाठी मतदान करा जिल्हा परिषद च्या शाळा ह्या वाचल्याच पाहिजेआणि आपली मुलं शाळेत शिकली पाहिजेया सर्व गोष्टीचा विचार करून आपण मतदान करावे (शेतकरी नेते गजानन भाऊ राउत माटरगांव)


Post a Comment

0 Comments