Type Here to Get Search Results !

*नांदुरा पोलीस डीबी पथकाची हद्दीमधे दारु विक्रेत्यावर कारवाई*


(उमाताई बोचरे नांदुरा)


आज दिनांक 15/11/2024 रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलदार हे नांदुरा हद्दी मध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाण  पंचवटी नांदुरा खुर्द येथे मारुती प्रल्हाद पानझडे वय 42 वर्ष रा. पंचवटी नांदुरा खुर्द ता. नांदुरा हा इसम अवैधरित्या विनापरवाना विक्री करण्याचे उद्देशाने एका थैलीमध्ये 90 एम एल मापाच्या 15 नग देशी दारू टॅंगो पंच च्या शिष्या थैली सह किमती 535/- रुपयाच्या जवळ बाळगताना मिळुन आला.

 ग्राम महाळुंगी येथे आकाश प्रभाकर वानखडे वय 24 वर्ष रा. महाळुंगी ता. नांदुरा हा इसम अवैधरित्या विनापरवाना विक्री करण्याचे उद्देशाने एका थैलीमध्ये 90 एम एल मापाच्या 20 नग देशी दारू टॅंगो पंच च्या शिष्या थैली सह किमती 710/- रुपयाच्या जवळ बाळगताना मिळुन आला.

तरी सदर कार्यवाही  पोहेका मिलिंद जंवजळ पोका विनोद भोजने,  सुनील सपकाळ,  योगेश निंबाळकर यांनी केली आहे.

 

Post a Comment

0 Comments