Type Here to Get Search Results !

*नांदुरा पोलीसांची दमदार कामगीरी विद्युत तारेची चोरी करणारा आरोपींना केले जेरबंद*

नांदूरा..

पोलीस स्टेशन नांदूरा हद्दीमध्ये बरेच ठिकाणी विद्युत तार चोरीच्या घटना होत असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता व पोलीस स्टेशन नांदुरा येथे व आजूबाजूचे पोलीस स्टेशनला विद्युत तार चोरीच्या तक्रारी प्राप्त होत होत्या सदर विद्युत तार चोरीच्या प्रकाराला आळा बसावा या हेतूने विद्युत चोरी करणारे धुमाकूळ घातलेल्या टोळीचा व चोरी गेलेल्या विद्युत तार चा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्या करिता पोलीस निरीक्षक श्री.विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांनी अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन केले त्यानुसार आज रोजी पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील पोलीस नाईक राहुल ससाने यांना मिळालेल्या माहितीनुसार खामगाव बायपास कडे जाणाऱ्या रोड जवळील व शासकीय धान्य गोदाम चे समोरील बाजूस आरोपी नामे शेख गुलाम शेख रजाक उर्फ गुल्ल्या रा पेठ मोहल्ला नांदुरा याचे टीनपत्राचे गोडाऊन मध्ये त्याने व त्याचे साथीदार यांनी चोरी केलेले इलेक्ट्रिक पोलवरील लघुदाब विद्युत तार वजन 330 किलो किमती 82 हजार पाचशे रुपये झडती दरम्यान मिळून आले आहे, आरोपी नामे शेख गुलाम शेख रजाक उर्फ गुल्ल्या रा पेठ मोहल्ला नांदुरा याचे व त्याचे सहकारी (गॅंग)  विरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध क्रमांक 677/24 कलम 303 (२) बीएनएस 136 भाविका प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी नामे शेख गुलाम शेख रजाक उर्फ गुल्ल्या याचा व त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन आता पावेतो त्यांनी केलेले विद्युत तार चोरी व इतर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता योग्य ती प्रभावी कायदेशीर कारवाई  गुण्यामध्ये गंभीर कलमांचा समावेश करून करण्यात येणार आहे.


सदर कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोहेका मिलिंद जंजाळ, राहुल ससाने, कैलास सुरडकर, विनायक मानकर, योगेश निंबाळकर, सुनील सपकाळ, रवी झगरे, यांनी केली आहे 



Post a Comment

0 Comments