Type Here to Get Search Results !

*रेती माफियाच्या टिप्पर ने ठोकली धुम रोडवर रेती खाली करुण तेथुन काढला पळ*

 रेती माफियाच्या टिप्पर ने ठोकली धूम 


(खामगांव प्रतीनीधी,

शेगांव तालुक्यातील भास्तन व कठोरा

पूर्णा नदीच्या पात्रातुन काठावरून रेतीचा अवैद्य उपसा 

दिवस-रात्र सव्वाशे ते दीडशे गाडीचा या शिवारातून सुरू आहे जळगाव जामोद  नांदुरा शेगांव खामगांव या तालुक्यांमध्ये या घाटावरून  रेतीची खुलेआम विक्री होत आहे नेहमी होत असते तर यासंबंधी कुठल्याच घाटाची हराशी न झाल्यामुळे या अवेंध्य रेती व्यवसायिकांची दिवाळी दिवस रात्र सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे 

या वाहनांना 

मर्यादेला वेग नसणाऱ्या त्यांच्या सुसाट टिप्पर सदृश्य इतर वाहन विना नंबर प्लेट चे सुसाट वेगाने धावत आहे

महसुली यंत्रणेचा कुठल्याच प्रकारचा धाक त्यांच्यामध्ये नसल्याने चिरीमरीचा ससेलोटा पाहता यांचं पावत असल्याचं दिसत आहे आज पहूर्जिरा ते माक्ता  या रस्त्यावर महसूल विभागाचे कर्मचारी व पत्रकारांचा एक ग्रुप या रस्त्याने येत असताना एका टिप्परधारकांनी रस्त्यावरच रेती खाली करून धूम ठोकली 

तर या रस्त्यावर पडलेल्या रेती मुळे दुचाकी वाहन यांचा अपघात होण्याची शक्यता आहे 

आरटीओ विभागाने दिलेल्या नंबरला हरताळ फासत 

जबाबदार अश्या विना नंबर प्लेटच्या गाड्यांवर कार्यवाही करण्याकरिता जबाबदार राहणारा विभाग काय करत आहे,रेतीची दिवसा ढवळ्या वाहतूक वर लक्ष देणारा विभाग काय करतो आहे सुसाट पळणाऱ्या  वाहनावर कोणता विभाग कार्यवाही करणार आदी याविषयी 

या भागातील जनमाणसात विविध चर्चा असल्याचे पहावयास मिळत आहे



Post a Comment

0 Comments