*आज विदर्भाची पंढरी असलेले संतनगरी शेगांव येथे बुलढाणा जिल्हा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने श्रींच्या चरणी साकड...*
*नुकतेच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये महायुतीचे भरघोस असे यश मिळाले, व महायुती बहुमताने महाराष्ट्रात निवडून आले आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ भाई शिंदे हे परत एकदा या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे या करिता श्री.संत गजानन महाराज यांच्या चरणी साकड व प्रार्थना बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर सभापती श्री. शांताराम पाटील दाणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ खानझोड पाटील, जळगांव जा. विधानसभा संघटक कैलास पाटील कडाळे, संग्रामपूर तालुका प्रमुख केशव पाटील ढोकणे, शेगाव तालुकाप्रमुख रामा थारकर, शेगाव शहर प्रमुख संतोष भाऊ लिप्ते, खामगाव तालुका प्रमुख राजू बघे, जळगाव जामोद तालुकाप्रमुख अजय पारस्कर, उपजिल्हाप्रमुख बाबा टावरी, शेगाव युवा सेना तालुकाप्रमुख उमेश दादा शेळके, युवा सेना तालुकाप्रमुख संग्रामपूर ईश्वर गावंडे व सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..*

Post a Comment
0 Comments