Type Here to Get Search Results !

*बोराखडी पोलीसांनी पकडला 38,लाखाचा अवैध गुटखा*

 *बोराखडी पोलीसांनी पकडला 38,लाखाचा अवैध विमल


गुटखा*


बुलढाणा, 10 डिसेंबर रोजी बोराखेडी पोलिसांनी 36 लाख 82 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आज 10 डिसेंबर 2024 रोजी माहिती मिळाली की, महिंद्रा बोलेरो पिकअप क्र एम एच 28 बीबी 7491 हे संशयीत वाहन खामगाव वरुन मोताळा येथे येत आहे. बोराखेडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सारंग नवलकार यांचे नेतृत्वात पो. उपनि. राजेंद्र कपले, पो.हे.कॉ. नंदकिशोर धांडे, रामदास गायकवाड, ना.पो.कॉ. श्रीकांत चिटवार, रमेश नरोटे, पो.कॉ. गणेश बरडे, श्रीकांत चिंचोले, वैभव खरमाळे, रविंद्र नरोटे, यांनी बोराखेडी फाटा येथे नाकाबंदी करुन वरील नमुद पिकअप वाहनाला जागीच अडवुन वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने अजय सिध्दार्थ खंडारे, वय 26 वर्षे, रा.भिमनगर, शिराजगाव, ता. खामगाव, विशाल संतोष कांबळे, वय 23 वर्षे, रा. चांदमारी फैल, खामगाव असे सांगितले, वरुन नमुद दोन्ही इसमाचे ताब्यातील संशयीत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा मिळुन आला आहे. नमुद इसमाचे ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत गुटखा किमंती 25 लाख 82 हजार  रुपये व पिक अप वाहन किंमत 11 लाख रुपये असा एकुण 38 लाख 82 हजार रुपयाचा मुददेमाल आरोपींकडे मिळून आलाआहे. करीता नमुद दोन्ही इसमांना अटक करून त्यांचे विरुध्द गुन्हा नोंद करुन पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत. या कारवाईमुळे बोराखेडी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments