पेपरकप मध्ये चहा वर बंदी जिल्हाधिकारी यांचे आदेशबुलढाणा (प्रतिनिधी) आझाद हिंद संघटनाचे अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोटे यांनी कागदी कप च्या आतील पातळ प्लास्टिकच्या पापुद्रामुळे गरम चहा मध्ये वितळत कॅन्सर होत असल्याची निष्कर्ष निघाली
असल्याचे सर्व सुख आहे याकरता ऍडव्होकेट रोटे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदन सादर करत या कागदी कपावर बंदी आणण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती त्यामुळे आज जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी पत्रक्र. कावि/स्था.निधी/कक्ष९.४/४/३/२०२दिनांक: 7/ ११ /२०२४ च्या पत्रानुसार सर्व विभाग प्रमुखयांना कळवितकॅन्सर सारख्या आजरांना कारणीभुत असलेल्या चहाच्या कागदी कपांवर त्वरीत बंदी घालण्याचे आदेश निर्गमित करुन कार्यवाही करणेबाबत सूचित केले आहे ॲड सतीषंचंद्र रोटे पाटील व इतरयांचे निवेदन नुसारकागदी कपात चिटकलेल्या प्लास्टिक अनुषंगाने चहाचे कागदी कप बनवितांना त्यामध्ये बीपीए नामक केमिकल चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लॉस्टीकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे चहाच्या कागदी कपांवरबंदी घालण्याबाबत या पत्रात नमुद केले आहे. त्यानुसार संदर्भिय पत्रानुसार नमुद मुद्यांचे अनुषंगाने नियमाप्रमाणे उचित कार्यवाहीसाठी अधिनस्त असलेलें सर्व शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, सार्वजनिक संस्था ई. कार्यालयांना आपले स्तरावरून कळविण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास व संबंधित अर्जदारास कळविण्यात यावे. असेही या पत्रात नमूद केले आहे तर यासाठी ऍड सतीशचंद्र रोटे यांनी व इतरांनी केलेल्यापाठ पुरव्यामुळे विविध चर्चा जिल्हयात नाही तर राज्यांत सर्व ठिकाणी होत आहे

Post a Comment
0 Comments