Type Here to Get Search Results !

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करुन फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करा व आरोपींना कठोर कारवाई करा . मुक्ताईनगर सकल मराठा समाजाची मागणी...

 सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करुन फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करा व आरोपींना कठोर कारवाई करा . मुक्ताईनगर सकल मराठा समाजाची मागणी...



(मुक्ताईनगर) ता.प्रतिनीधी(संदीप घाईट):-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील तरुण सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्याची अमानुषपणे हत्या करण्यात आली.सदर घटना घडुन आज १५ दिवस झाले तरी मारेकऱ्यांना अटक झाली नाही.त्यातील काही गुन्हेगार राजरोसपणे फिरत आहे.तसेच ह्या गुन्ह्यांतील मुख्य सुत्रधारांचा शोध घेऊन त्यास लवकरात लवकर अटक करावी.सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारे केसेस चालवावी.असे आज सकल मराठा समाज मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने तहसीलदार,आणि पोलिस निरीक्षक,यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अध्यक्ष आनंदराव देशमुख,कुर्हा विभाग अध्यक्ष नवनीत पाटील, उपाध्यक्ष विनोद पाटील, दिनेश भाऊ कदम, साहेबराव पाटील,ज्ञानेश्वर पाटील,सोपान दुट्टे, प्रफुल्ल जवरे, युवराज पाटील, सचिन पाटील,गोलु मुल्हे, प्रफुल्ल पाटील, गणेश थेटे,सुभाष बनिये,दिपक वाघ, विजय पाटील,संजय मराठे, संदीप घाईट,उमेश पाटील,छोटू पाटील, संतोष मराठे,संदीप चौधरी, जितेंद्र पाटील,डी.के.पाटील,सुभाष पाटील, वासुदेव महाजन,प्रदिप कोल्हे,विष्णु पाटील,ललीत बावस्कर,दिलीप पाटील,मोहन म महाजन, संदीप शिंदे,संजय मराठे,गोपाळ धुंदे,देवेद काटे,व आदि समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments