Type Here to Get Search Results !

*सहा महीने नांदूरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार तड़ीपार **


नांदुरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी कोणतेही गंभीर स्वरूपाचे लोकांचे आरोग्यास व मालमत्ते नुकसान पोहोचणारे गुन्हे घडू नये यासाठी उपाय योजना म्हणून अशी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार आरोपिताविरुद्ध विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्या कृत्यास आळा घालण्याचे काम पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असते असेच शरीराविरुद्धचे व मालमत्तेचे विरुद्धचे गुन्हे करणार आरोपी नामे *मुक्तार बेक अकबर बॅग मिर्झा वय 42 वर्ष राहणार वडनेर भोलजी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा* याच्या विरुद्ध नांदुरा पोलिसांच्या वतीने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब मलकापूर यांच्या मार्फतीने माननीय उपविभागीय दंडाधिकारी मलकापूर यांच्या न्यायालयामध्ये 56(1)(अ )(ब) महाराष्ट्र  पोलीस कायदा प्रमाणे नियोजित हद्दपार प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावाची माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब मलकापूर यांनी दखल घेऊन पोलीस विभागाने दाखल केलेले हद्दपारचे प्रकरण मंजूर करून सदर आरोपीस दि 14/10/2024 पासून मलकापूर ,मोताळा व नांदुरा तालुक्यामधून सहा महिन्याकरिता हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहे. सदर आरोपीस नमूद तालुक्यांच्या प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राच्या आत यावयाचे असल्यास सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस स्टेशन नांदुरा  हद्दीमध्ये  सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग करणार शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर  गुन्हे करणार इतर आरोपीता विरुद्ध सुद्धा हद्दपारिचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात येत आहेत.

सदरची कारवाई श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांची मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे अधिनस्त अधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments