• रोटरी मतिमंद विद्यालयामध्ये आरोग्य तपासणी शिबिर
खामगांव
दि. १४ डिसेंबर 2024 शनिवार रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन विद्यालयामध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी बालरोगतज्ञ डॉ. हरी वडोदे सर डेंटिस्ट डॉ. प्रकाश गाडोदिया सर, जनरल सर्जन डॉ. गौरव गोयनका सर मनोचिकित्सक डॉ. कोमल गोयनका मॅडम फिजिओथेरपिस्ट डॉ. अनूप शंकरवार सर उपस्थित होते. सर्वप्रथम हेलन कीलर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करीत त्यानंतर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली विद्यार्थ्यांच्या हस्ते उपस्थित सर्व डॉक्टरांचे स्वागत करून तपासणी कॅम्पाला सुरुवात केली. सर्व डॉक्टर महोदयांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष श्री दिपक अग्रवाल सर रो. आशिष पटेल, रो. विशाल गाँधी, मुख्याध्यापिका सौ. सरिता साठे मॅडम, विशेष शिक्षीका हर्षा थोरात,. कलाशिक्षीका सौ. शिल्पा जुनारे, शिपाई विलास वाकोडे काळजीवाहक सौ नलिनी काटे विद्यार्थी व पालक उपस्थित होते,
आपली विश्वासू
सरिता साठे
मुख्याध्यापिका
रोटरी मतिमंद शाळा खामगाव

Post a Comment
0 Comments