Type Here to Get Search Results !

विभागीय शालेय अस्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धेत शिवशंभु मर्दानी आखाडा च्या विद्यार्थ्यांचा डंका*

 *विभागीय  शालेय अस्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धेत शिवशंभु मर्दानी आखाडा च्या विद्यार्थ्यांचा डंका*



     रोहिणखेड येथील शिवशंभू मर्दानी आखाडा रोहिण खेड च्या विद्यार्थ्यांनी दिनांक 4 डिसेंबर 2024 अमरावती येथे झालेल्या विभागीय अष्टे-डू-आखाडा स्पर्धेत घवघवीत यश मिळवत झालेल्या स्पर्धेत एकूण 3 विद्यार्थ्यांनी विजय मिळवत, सर्वांची राज्य स्तरावर निवड झाली आहे.

 सविस्तर वृत्त असे की, दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी अमरावती येथे विभागीय शालेय अष्टे-डू-आखाडा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात अष्टे-डु-आखाडा स्पर्धेत 14वर्षे वयोगटात *गणेश संदीप भुसारी*  यांनी विजय मिळविला तर 17वर्षे वयोगटात *सायली शैलेश गुजर* यांनी विजय मिळवला तर 19 वर्षे वयोगटात *प्रगती जीवन राजनकर* यांनी विजय मिळवला.  स्पर्धेत एकूण 3 विद्यार्थ्यांनी विजय मिळवत त्यांची राज्य  स्तरावर निवड झाली आहे.

  या मिळवलेल्या यशाबद्दल बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी विजेत्या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे. स्पर्धेसाठी शिवशंभू मर्दानी आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच प्रशिक्षक संभाजी भाऊ हाडे यांनी मेहनत घेतली तर समस्त गावकऱ्यांनी ही विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments