जिल्हा परिषद
माटरगाव बुद्रुक येथील मुलांची शाळा येथील हेडमास्तर .19.12.2024ला शाळेवर रुजू झाले पण ते एकही दिवस शाळेवर वेळेवर रुजू झाले नाही वास्तविक पाहता शाळेचा टाईम हा10.30ते5.00वाजेपर्यंत असतो पण हे हेड मास्तर बारा-साडेबाराला शाळेमध्ये येतात व दोन अडीच वाजता शाळेतून घरी चालले जातात यामुळे येथील विद्यार्थ्यांचा प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे वास्तविक पाहता त्यांना पॅरॅलिसिस असल्यामुळे त्यांच्या जागी दुसरे हेडमास्तर देण्याची शिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी असायला पाहिजे होती यासाठी आपणवेळोवेळी निवेदन देऊन आंदोलन सुद्धा केली पण या गोष्टीचा वरिष्ठ पातळीवर कोणत्याच प्रकारचा परिणाम झाला नाही वास्तविक पाहता शाळेवर रुजू झाल्यानंतर साडेदहा ते पाच वाजेपर्यंत प्रत्येक शिक्षकाने कामावर यायला पाहिजे पण पंचायत समिती शेगाव व शिक्षण अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार असल्यामुळे शाळेकडे दुर्लक्ष होत आहे आम्ही वेळोवेळी शाळेवर गेलो पण आम्हाला शिक्षक उपलब्ध दिसला नाही यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे अशा शिक्षकावर योग्य ती कारवाई करून विद्यार्थी यांना शैक्षणिक न्याय द्यायला पाहिजे असे आम्ही निवेदन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती शेगाव व बीडीओ साहेब यांना दिलेला आहे तरी यांचा पगार थांबवून यांच्या जागी दुसरे हेडमास्तर देण्याची आमची मागणी आहे यांच्या प्रतिलिपी आम्ही सन्माननीय आमदार साहेब आकाश दादा फुंडकर व शिक्षणाधिकारी बुलढाणा यांच्याकडे पाठवलेले आहेत तरी इथल्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळेल अशी सर्व पालक वर्ग आशा करतात

Post a Comment
0 Comments