*प्रजासत्ताक दिनी सुरजभैय्या यादव 4 राज्यातून सम्मानपत्र देवून सम्मानीत*
*दिनांक 28 जानेवारी 2025*
खामगांव :- आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून गरजु गरीब रुग्णांना वेळोवेळी रक्ताची व आर्थिक मदत सुरजभैय्या यादव एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन मिञ मंडळीला सोबत घेऊन सेवाकार्य करत आहे. एकनिष्ठा फाउंडेशनचे कार्य पाहता पाहता आज आपल्या भारत देशाच्या प्रत्येक राज्यात पसरलेले आहे. प्रजासत्ताक दिनी प्राण रक्षक सम्मान 2025
जिया माँ साहित्य मंचच्या संस्थापिका रीता सिंह बेंगलूरू यांनी सम्मानपत्र देऊन सम्मानीत केले. नव जिवन युथ फाउंडेशनचे संस्थापक हसमुख पटेल गुजरात यांनी प्रजासत्ताकदिनी सम्मानपत्र देऊन सम्मानीत केले. इन्सानियत वेलफायर सोसायटी संस्थापक कुदरत खान लखनऊ उत्तर प्रदेश यांनी सम्मानपत्र देऊन सम्मानीत केले. रक्तवीर सम्मान सर्टिफिकेट स्वर्गीय अशोक कुमार जी अग्रवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ नयन एग्रो लिमिटेड खंडवा मध्य प्रदेश यांच्या तर्फे सम्मानपत्र देऊन सम्मानीत करण्यात आले. रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी रुग्णसेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ - सेवा रक्तसेवा फाउंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव यांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी बेंगलूरू , गुजरात , उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , या चार राज्यातून त्यांना सम्मानपत्र देऊन सम्मानीत करण्यात आले. सुरजभैय्या यादव यांच्यावर चाहत्या कडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे व आपल्या हातून अशीच निरंतर सेवा घडो अशी अपेक्षा लोकांकडून होत आहे अशी माहिती विकास शेगोकार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रकाशित करावी ही नम्र विनंती. 🙏🏻

Post a Comment
0 Comments