Type Here to Get Search Results !

सोयाबीन आणि कापसाचे तुरीचे दर एकदम खालच्या स्तरावर शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी हेच शासनाचे धोरण

 कापूस सोयाबीन तुरीचे दर हे एकदम खालच्या पातळीवर आलेले आहेत सोयाबीन 3500 ते 3800 रुपये कापूस ६४ ते ६५ आणि आता तू सहा हजार ते 6500 वर आली शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आत्महत्या करावी हेच या सरकारचं धोरण आहे हमीभावाचा कोणताही कायदा नाही वास्तविक पाहता बाजारामध्ये हमीभावाच्या कमी कोणीही माल खरेदी करू नये असा कायदा करायला पाहिजे वायदे बाजार चालू करायला पाहिजे पण या सरकारचं या विषयाकडे थोडसंही लक्ष नाही यामुळे शेतकरी बँकांचे कर्ज सावकारी कर्ज फेडू शकत नाही मुलांचा शिक्षणाचा खर्च हा ही या भावाच्या उत्पन्नातून निघत नाही शेतकरी हा हवालदिल झालेला आहे पण या सरकारला शेतकऱ्यांचं काही देणंघेणं नाही शेतकऱ्यांनो यापुढे जमिनी पेरू नका एकदा शेतकऱ्याचीच निर्यात करून टाका जर भविष्यात शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाले नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि भविष्यात शेतकरी शेतकऱ्यांची मुलं नक्षलवादी बनल्याशिवाय राहणार नाहीत कर्मचाऱ्यांना न मांगता ही आठवा वेतन आयोग लागू करण्याची सरकार तयारी करत आहे पण शेतकऱ्याचा स्वामीनाथन आयोग लागू करण्याची या सरकारची हिंमत होत नाही या सरकारने शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा एक एक दिवस शेतकऱ्यांची मुलं बरबाद झाल्याशिवाय राहणार नाहीत

Post a Comment

0 Comments