*नांदुरा पोलिसांनी पोलीस वर्धापण दिन निमित्ताने शाळा महा विद्यालय मध्ये केले जनजागृती व मार्गदर्शन
**
दि, o2 /01/25 हा पोलीस वर्धापण दिन असतो त्या निमित्ताने नांदुरा पोलिसांनी पो, स्टे, परिसरातील शाळा कॉलेज यांना भेटी देवून विद्यार्थी मुले मुली यांना पोलीस यांची कर्तव्य , नवीन कायदे, लहान मुलांनकरिता असलेले कायदे व अधिकार, शिक्षा कलम, डायल 112, पोलीस हेल्प लाईन नंबर निशुल्क सेवा नंबर महिला व बाल कल्याण सेवा 1908 , mpsc, upsc परीक्षा बाबत मार्गदर्शन, पोलिसांची अधिकार, कर्तव्य , गुड टच बेड टच, महिला मुली विद्यार्थी सुरक्षा, शाळेत cctv केमेरे लावणे, तक्रार पेटी लावणे सुरक्षा कर्मचारी योग्य नेमणे, वाहतूक अपघात, व्यसना पासून दूर रहावे याबाबत, तसेच काहीही तक्रार असतील तर त्वरित पोलिसांना माहिती द्यावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थिनी विद्यार्थी यांनी सुद्धा पोलिसांना चर्चा सत्रात भरपूर प्रश्न विचारले पोलिसांनी ही योग्य मार्गदर्शन केले असे शैक्षणिक कार्यक्रम पोलीस वर्धापन दिन निमित्ताने नांदुरा पोलिसांनी महात्मा फुले शाळा निमगावं, यशवंत विद्यालय चांदुर बिस्वा, कोठारी कॉलेज नांदुरा, इनायतीया हायस्कुल नांदुरा, मौलाना आझाद स्कुल नांदुरा येथें आयोजन करून पोलीस निरीक्षक विलास पाटील व महिला पोलीस उप निरीक्षक सौ क्रांती ढाकणे यांनी मार्गदर्शन केलेले आहे
तसेच सर्व शाळेना विद्यार्थी यांना पोलीस स्टेशनला भेटी देवून पो, स्टे चे कामकाज पाहने, पोलिसांची अग्नीशस्त्र, दारूगोला, लाठी ढाल हेल्मेट बंदूक अश्रू धूर नळकंडे प्रदर्शनी ही मंगळवार दि, 07/01/25 रोजी 11/00 वा पो, स्टे, नांदुरा येथें आयोजन करण्यात येणार आहे
पोलीस निरीक्षक विलास पाटील. पो. स्टे. नांदुरा.









Post a Comment
0 Comments