मलकापूर प्रतिनिधी:- मलकापूर येथे दिव्यांग मल्टिपपर्ज फाउंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त भगवान महावीर निवासी मूकबधिर विद्यालय मलकापूर या शाळेतील मुलांना भोजन देण्यात आले.
त्यावेळी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या मूकबधिर शाळेतील मुलांना भोजन व दिव्यांग बांधवांना रेल्वे पास मोफत वाटप करण्यात आल्या. तसेच लि.भो. चांडक विद्यालय येथील वर्ग 10 वी तील दिव्यांग विध्यार्थ्यांला शाळेतीलच काही मुलं व मुली सहकार्य करत असतात त्या मुलांचे सहकार्य करणे हे खुप कौतुकाचे आहे.त्या दिव्यांग विध्यार्थ्याचे व त्याला मदत करणाऱ्या विध्यार्थीचे दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
फाउंडेशनच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रसिद्ध उद्योगपती मनीष भाऊ लखानी, मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे साहेब, शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय भाऊ टप, पत्रकार श्रीकृष्ण भगत, पत्रकार सतीश दांडगे, पत्रकार श्रीकृष्ण तायडे, पत्रकार करण सिरस्वाल,पत्रकार धर्मेश ठाकूर,पत्रकार अशोक गाढवे,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अजित फुंदे महावितरणचे कर्मचारी अंनत दिवणाले यासह आदींची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळु चोपडे, सचिव शेख रईस, जिल्हासचिव शरद खुपसे, मलकापूर तालुकाध्यक्ष निलेश अढाव, सदस्य अंकित नेमाडे, अनिल खोलगडे, दत्ता नारखेडे, संतोष लिलाकर, संतोष तडके, सचिन वनारे, प्रवीण पाटील, गजानन बोरसे,महादेव भगत आदिसह दिव्यांग बांधव उपस्थिती होते.







Post a Comment
0 Comments