खामगाव येथे १२ जानेवारी रोजी आदिवासी पारधी टाकोनकार समाजाचा लाळा लाळीनी पसन ना खाजू*(वधूवरांची पसंती) मेळाव्याचे आयोजन
गजानन डाबेराव
जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र दर्शन न्युज बुलढाणा
बुलढाणा :-आदिमाया नारीशक्ती आदिवासी पारधी टाकणकर महीला मंडळाच्या वतीने
दि: १२ जानेवारी ,२०२५ रविवार रोजी सकाळी ९.३० वाजता वधूवरांची पसंतीआणि निवड तसेच चित्र (पोस्टर) व्दारे वाघरी संस्कृतीचा जागर करून जपू या पूर्वजांचा वारसा आणि *वाघरी बोली भाषा पुनर्जिवित*करणे बाबतचे मार्गदर्शन माळी भवन,खामगांव येथे आयोजित केले आहे हे उपक्रम आपल्याच समाजासाठी आम्ही समाज भगिनी राबवत आहोत .आपण समाजाचे देणे लागतो ही आमची समाजहितार्थ भावना असून ती जपल्या जावी यासाठी
आपण मेळाव्यास उपस्थित राहून योग्य प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा .आदिमाया नारीशक्ती आदिवासी पारधी टाकणकर महीला मंडळ, महाराष्ट्र राज्य
अध्यक्षा व कार्यकारिणीचे सभासद सर्व आदिवासी पारधी टाकोंकार समाज बांधवांनी उपस्थित राहावे ही विनंती

Post a Comment
0 Comments