Type Here to Get Search Results !

मिसाल ऐ भारत अवार्डनी रक्तमित्र सुरजभैय्या यादव सम्मानीत*

 *मिसाल ऐ भारत अवार्डनी रक्तमित्र सुरजभैय्या यादव सम्मानीत*



*दिनांक 7/01/2025*

खामगांव :- रक्तदान क्षेत्रात नेहमी चळवळ सुरू ठेवलेले आपल्या सर्वांचे परिचित खामगांव येथील सामाजिक कार्यकर्ते रक्तमित्र एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या यादव यांच्या रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी मराठी पत्रकार  दिनी मिसाल द प्राईड ऑफ सोसायटी पंजाबचे फाउंडर महकप्रीत सिंह, को -फाउंडर यश मोदगिल यांनी मिसाल ऐ भारत अवॉर्ड 2024 /2025 प्रशंसा सम्मान पत्र सर्टिफिॅकेट देऊन सुरजभैय्या यादव यांना सम्मानीत केले. मागील 12 वर्षा पासून एकनिष्ठा गौ -सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या मिञ मंडळीला सोबत घेऊन नेहमी गरीब, गरजू , दिव्यांग, रुग्णांना वेळोवेळी रक्त पुरवठा करून रक्ताची निशु:ल्क सेवा ते देत आहे आणि विशेष म्हणजे ते स्वतः हुन पण रक्तदान करून रुग्णाला जिवनदान देण्याचे सेवा कार्य त्यांनी सुरू ठेवलेले आहे. एकनिष्ठा फाउंडेशनच्या रक्तसेवा कार्याची दखल घेऊन त्यांना प्रशंसा पत्र काल दिनांक 6 जानेवारी रोजी देण्यात आले.रक्तमित्र सुरजभैय्या यादव यांनी आता पर्यंत हजारो गरजू रुग्णांना वेळेवर रक्ताची पिशवी व तसेच रक्तदाते उपलब्ध करून दिले व स्वतःही नियमित दर तीन महिन्यांनी रक्तदान करून रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ते दिवस असो रात्र असो सदैव प्रयत्नशील असतात त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना प्रशंसा पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल. 


*वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात लावण्याची कृपा करावी 🙏🏻*

Post a Comment

0 Comments