*रानडुकराच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी*
(अफसर भाई मोताळा )
मोताळा तालुक्यातील कोथळी येथील शेतमजूर असलेले हमीद खा समसेर खा वय अंदाजे 47 वर्ष रा .कोथळी गावाजवळ पल्डग शिवारात शेतात गहू पिकाला पाणी देत असताना त्यांच्यावर अचानक रानडुकराने हल्ला केला त्यात ते गंभीर जखमी झाल्याची घटना कोथळी शिवारात घडली
प्राप्त माहितीनुसार दिनांक ७/१/२०२५ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पल्डाग गावाजवळ शेतात गाहूच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता अचानक मकाच्या पिकात दडून बसलेल्या ५ ते ६ रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्यात ते घाबरून गेले व खाली पडले स्वतःला वाचवण्यासाठी व मदतीसाठी जोर जोरात आरडाओरडा केला त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे शेतकरी व शेतमजूर सदर ठिकाणी धावत आले व त्यांनी रानडुकरास हिसकावून लावले परंतु त्या हल्ल्यात हमीद खान यांच्या हाताच्या पंजांला मोठ्या प्रमाणात डुकरांची नखे लागलेली असून डाव्या पायाच्या चावा घेतल्यामुळे मांडीवरील मासाचे लचके तोडल्या गेले व त्यामुळे मोठी जखम झाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच
ग्रामस्थांच्या व शेतमजुराच्या मदतीने त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात बुलडाणा येथे उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे
सदर व्यक्ती हा घरातील कमावता पुरुष असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे
त्यामुळे त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी तसेच हिस्त्र प्राण्यांचा दिवसान दिवस गावाजवळ वाढत असलेला मुक्त
संचार थांबवण्यासाठी वन विभागाने योग्य ते उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे



Post a Comment
0 Comments