*हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने मलकापूर येथे भव्य पत्रकार दिवस साजरा*
*राज्यस्तरीयपत्रकार रत्न पुरस्कार, आदर्श संपादक पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार, उद्योग रत्न पुरस्कार, दर्पण मित्र पुरस्कार ठरले विशेष आकर्षण*
आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघाद्वारे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार सत्कार समारंभाचे आयोजन मलकापूर येथे भातृ मंडळ हॉल येथे करण्यात आले. यामध्ये पत्रकार बांधवांना आदर्श पत्रकार, संपादक व पत्रकार रत्न पुरस्कार वितरित करण्यात आले सोबतच वृत्तपत्र विक्रेता, फोटोग्राफर यांना सुद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले करण्यात आले .
दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात करून बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारिते मुहूर्तमेढ रोवली याचीच आठवण म्हणून 6 जानेवारी रोजी पत्रकार दिवस साजरा करण्यात येतो तद्वतच मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघ तर्फे पत्रकार दिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांनी भूषवले तर प्रमुख वक्ता म्हणून निलेश जोशी आवृत्ती संपादक दैनिक तरुण भारत हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, राहुल तायडे तहसीलदार मलकापूर, गणेश गिरी ठाणेदार मलकापूर, संदीप काळे ठाणेदार मलकापूर ग्रामीण , हेमराज कोळी ठाणेदार एमआयडीसी , जसबीर राणा थानेदार रेल्वे सुरक्षा बल, अशांतभाई वानखेडे समतेचे निळे वादळ, प्राध्यापक अनिल खर्चे प्राचार्य वी . भी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज, जयंतराव राजुरकर प्राचार्य, सुषमाताई राजपूत, सचिन तायडे अभियंता सा बा , आप्पासाहेब पाटील मा नगरसेवक, सुभाष राजपूत उद्योजक, बाळासाहेब दामोदर जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, रमेश उमाळकर जेष्ठ पत्रकार, हनुमान जगताप जेष्ठ पत्रकार, वीरसिंग दादा राजपूत जेष्ठ पत्रकार ,गजानन ठोसर जेष्ठ पत्रकार ,दामोदर शर्मा शेतकरी नेते हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात अधिक प्रज्वलन करून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिर्जे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी राज्यस्तरीय पत्रकार रत्न पुरस्कार निलेश जोशी अकोला, अशोक जैस्वानी खामगाव, वीरसिंहदादा राजपूत मलकापूर, विजय कुलकर्णी खामगाव यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून राज्यस्तरीय जेष्ठ पत्रकार पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार, तसेच वृत्तपत्र विक्रेता सन्मान या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला बुलढाणा, जळगाव व अकोला जिल्ह्यातील अनेक पत्रकार बांधवांनी हजेरी लावली
साप्ताहिक दर्पणच्या पत्रकार दिवस विशेषांकाचे विमोचन तसेच दैनिक विश्वजगात च्या दिनदर्शिकेचे विमोचन या कार्यक्रमात करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय टप, सतीश दांडगे, गौरव खरे, महेश खरे, श्रीकृष्ण भगत, मयूर लड्डा, प्रदीप इंगळे, सय्यद ताहेर, सुधाकर तायडे या पत्रकार बांधवांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नीता कुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.
चौकट
पत्रकार दिवसाच्या समारंभाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांचे पत्रकार व संपादक बांधवांना नेहमीच सहकार्य लाभत असते या भावनेतून उपस्थित मान्यवरांचा हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या हस्ते दर्पण मित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .
चौकट
हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार यावेळी उद्योजक मनीषभाऊ लखानी मलकापूर, व सुभाष राजपूत (एमडी मुद्रा इंडिया लिमिटेड) चिखली यांना प्रधान करण्यात आला

Post a Comment
0 Comments