शिवसेना (ऊ बा ठा )खामगांव तालुका यांचे वतीने शासनाच्या एस टी भाडेवाड विरोधात चक्काजाम निषेध आंदोलन 🚩 शिवसेना खामगांव
तालुका व शहराचे वतीने खामगांव बस स्थानक येथे शासनाने नुकतीच एस टी महामंडळाची केलेली भाडेवाढ यांचे विरोधात चक्काजाम निषेध आंदोलन करण्यात आले निवडणूक संपताच बहुमताचे सरकार आल्यावर जनतेच्या खिशाला कात्री लावून निवडणुकीत दिलेने आश्वासन पुर्ण नं करता सामान्य जनतेच्या खिशातून पैसे उकळण्याकरिता ही भाडेवाड करण्यात आली आहे या ठिकाणी शासनाचा निषेध करून रोष व्यक्त करण्यात आला नवीन एस टी बस देण्यात आल्या असा गवगवा करून केलेल्या भाडेवाडीवर जनतेची दिशाभूल करण्याचे काम करण्यात येत आहे आम्ही शिवसेनेच्या वतीने माहिती घेतली असता खामगांव आगाराला दहा नवीन बस देण्यात आल्या परंतु चांगल्या चालू स्थितीतील सात बस दुसऱ्या डेपोला दिल्या त्यामध्ये तीन शेगाव तीन मलकापूर एक जळगाव जामोद डेपोला दिली खामगांव तालुक्याचे ठिकाणी विद्यार्थी शेतकरी व्यापारीमहिला वर्ग व मोठया प्रमाणात येतात भाविक भक्त शेगावला जात असतात त्यामुळे या ठिकाणी बस कमी पडतात शासनाने जनतेची दिशाभूल थांबवून निवडणुकीत दिलेली आश्वासणे पुर्ण करावी ही मागणी करत निषेध व्यक्त करण्यात आला याकरिता भिकूलाल जैन विधानसभा समन्व्यक खामगांव तालुका प्रमुख श्रीराम खेलदार सुभाष ठाकूर गजानन माने उपतालुका प्रमुख युवा सेना शहर प्रमुख अक्षय हातेकर दिनेश पतंगे महिला आघाडी तालुका प्रमुख श्रुती ताई पतंगे नंदाताई दुबे पल्लवीताई पाटील विद्यार्थी आघाडी अतुल खारोडे विभाग प्रमुख मंगेश क्षीरसागर उपशहर प्रमुख अश्विन जाधव दीपक कांबळे शुभम बावस्कार पंजाब राव पेसोडे इम्रान भाई सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते

Post a Comment
0 Comments