Type Here to Get Search Results !

*चिचखेड गावात 1962 पासुन समशान भूमी साठी नसलेल्या जागेचा ग्राम पंचायत सचिव सरपंच उप सरपंच व ग्रामंस्थ यांनी लावला शोध* *




 ग्रामपंचायत चिचखेड ह्या गावचे पुनर्वसन अंदाजे 1962 यावर्षी झाले आहे तेव्हापासून गावातील कोणीही व्यक्ती मयत झाल्यास त्यांच्या अंत्यविधीसाठी समशान भूमी नव्हती त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे खूप हाल होत होते मागील अंदाजे चार महिने अगोदर गावात नवीन सचिव श्री राजू गावडे हे रुजू झाले त्यावेळी  त्यांनी व सरपंच सौ माणकर्णा बाई  महादेव डुकरे यांनी सदर विषय गांभीर्याने घेऊन शासकीय जागेचा शोध घेतला असता सन 1986 मधील सातबारा गट नंबर 45 मध्ये 84 आर शेत समशानभूमीसाठी राखीव निघाले त्यामुळे समशानभूमीचा विकास करण्या साठी आता  वरिष्ठाकडे  पत्रव्यवहार करून पुढील कामे करणार आहे त्या अगोदर सरपंच उपसरपंच व सर्व सन्मानीय ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा समशानभूमीसाठी करिता कोणी जागा दान देतात का याचा शोध घेतला परंतु त्यावर समाधानकारक उपाय सापडला नाही आज रोजी चिचखेड या गावापासून ते समशानभूमीपर्यंत च्या रोडचे काम शासकिय निधीमधून चालू आहे

Post a Comment

0 Comments