Type Here to Get Search Results !

हिट अँड रन वरील बंदी उठवावी.* *स्नेहलच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी.* *समाजमन एकवटले शासनाला निवेदन दिले.*

 *हिट अँड रन वरील बंदी उठवावी.* 


 *स्नेहलच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी.* 


 *समाजमन एकवटले शासनाला निवेदन दिले.* 



बुलढाणा:

10 फेब्रुवारीला सकाळी बुलढाणातील त्रिशरण चौकात स्नेहलचा दुर्दैवी अंत झाला. दारू पिलेल्या सतीश बाहेकरणे स्नेहल ला बोलेरो पिकप खाली अमानुषपणे चिरडले. सर घटनेचे त्रिव पडसाद जिल्हाभर उमटले. अशातच आरोपीला अटक आणि सुटका दुसरी दुर्दैवी घटना बुलढाणा करांनी अनुभवली. त्यामुळेच समाजमन एकवटले.सदर घटनेचा निषेध म्हणून कॅण्डल मार्च काढला. तर आज निवेदन सादर केले.

निवेदनामध्ये स्नेहल चौधरीच्या मारेकऱ्यांना अटक करा. वास्तविक घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन अधिनियम कायदा च्या प्रचलित कलमानुसार गुन्हे दाखल करून कारवाई करावी.एक जुलै 2024 पासून हिट अँड रन कायद्यावर लावण्यात आलेली बंदी त्वरित काढण्यात यावी.शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करावे. यासह इतर मागण्यांसाठी स्नेहल चौधरीचा परिवार आणि सर्वपक्षीय, संघटनांच्या प्रतिनिधी यांनी आज 14 फेब्रुवारीला सकाळी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री, गृह सचिव,  सचिव यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आक्रोश निषेध मोर्चा काढण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर स्नेहल चा परिवार शहरातील सर्वपक्षीय संघटनांचे प्रतिनिधी,नागरिक महिलांच्या स्वाक्षरी आहे.

____

Post a Comment

0 Comments