Type Here to Get Search Results !

वन्यप्राण्याकडून शेती पिकाचे नुकसान* *शेतकरी हतबल *, *पिकाचे अमाफ नुकसान*

 *वन्यप्राण्याकडून शेती पिकाचे नुकसान* *शेतकरी हतबल *, *पिकाचे अमाफ नुकसान* 



मोताळा  तालुक्या अंतर्गत येत असलेल्या ग्राम गिलोरी येथील  शेतकरी पंजाब राघो चव्हाण यांनी आपल्या शेतामध्ये एक हेक्टर  मका पिकाची लागवड केली होती   पीक जोमात असताना वन्य प्राण्यांचा मुक्त संचार यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे सुमारे दोन दिवसा अगोदर 13.2.2025 च्या मध्य रात्री अंदाजे 12 च्या सुमारास वन्य प्राण्यांचे कळप ज्यात रोहि , हरीण व रानडुक्कराच्या कळपांनी हैदोस माजवत शेतात उभ्या असलेल्या पिकाचे आतोनात नुकसान व फस्त केले गीलोरी या गावाला ज्ञानगंगा अभयारण्याच्या सीमा सलग्न असून नेहमी वन्य प्राणी व हिस्त्र प्राणी गावात येण्याचं व नुकसान करण्याच्या घटना नेहमी घटत असतात  पूर्वीच  यंदा  शेतकरी हा  हवालदार झाला पाहिजे तसा शेतात माल   झाला नाही त्यामुळे अंदाज उत्पन्नात घट व शेतमालाला भाव  नाही

अशी दयनीय अवस्था शेतकऱ्याची झाली असून

या बिकट परिस्थितीतून व आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या अल्प जलस्त्रोत व विहिरीच्या पाण्यावर रब्बी पीक म्हणून मका गहू ज्वारी पिकाची लागवड केली होती जेणेकरून खरीप पिकात झालेले नुकसान थोड्याफार प्रमाणात का होईना

कमी करता येईल मात्र वन्य प्राण्याकडून त्याचीही अपेक्षा त्यांच्या पायाखाली तुडवले गेली त्यांचा अतोनात त्रास शेतकऱ्याला सहन करावा लागत असून सदर शेतकऱ्याचे जवळपास अंदाजे  80,हजाराचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे शासन व प्रशासनाला विविध संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलन करून सुद्धा जाग येत नाही आत्ताच आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने डी एफ ओ कार्यालय बुलढाणा येथे  कार्यालयाला शेतकऱ्याच्या वन्य प्राण्यापासून होणाऱ्या नुकसानासाठी व  त्यांना पारध करण्याच्या परवानगी देण्यात आली असे असताना सुध्या वन्य प्राण्यांची संख्या ही  ,असंख्य  असून त्यांचा बंदोबस्त करणे हे

वनविभागाला एक प्रकारे आव्हानात्मक  व चिंतेची बाब आहे त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे

असे असून सुद्धा मात्र सदर विषयाकडे  शासन व प्रशासन  दुर्लक्ष करत असल्याचे समजते

सदर शेतकऱ्याचा झालेल्या नुकसानाचे सर्वे करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी समस्त गावकरी करत आहे

Post a Comment

0 Comments