धर्मनाथ बिज महोत्सव व यात्रोत्सव थाटात संपन्न...........
February 01, 2025
0
धर्मनाथ बिज महोत्सव व यात्रोत्सव थाटात संपन्न........... मुक्ताईनगर प्रतिनिधी (
संदीप घाईट):-मुक्ताईनगर जळगांव जिल्ह्यातील शेवटचे गाव असलेले वडोदा पानाचे येथुन थोड्याच अंतरावर असलेले मच्छिंद्रनाथ नवनाथ महाराज संस्थान सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले असुन.या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे धर्मनाथ बिजोत्सव,यात्रोत्सव तसेच अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.येथे गावातील व शेजारील गावातील तसेच विदर्भातील व खान्देशातील हजारो भावीक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात आशिर्वाद घेत असतात व आनंद घेत असतात.या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता धर्मनाथ बिज या दिवशी करण्यात येते.संस्थान चे अध्यक्ष रविभाऊ खिरळकर व विश्वस्त मंडळी सर्व नियोजन करत गावांमध्ये वर्गणी जमा करूण या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन व सर्व सोयी सुविधा करत असतात. या ठिकाणी गावातील ३०० ते ४०० महिला स्वयंसेवक रुपी आपले कर्तव्य बजावत असतात.तसेच तरुण, वृद्ग भावीक याठिकाणी मेहनत घेत असतात व सेवा देत असतात.धर्मनाथ बिज या दिवशी जळगाव जामोद व मुक्ताईनगर आगारातर्फे बसेस ची व्यवस्था करण्यात येते.मुक्ताईनगर पोलीस स्टेशन व कुर्हा दुरक्षेत्र पोलीस प्रशासन सुरक्षा देत असतात व या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असतात.आज मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार मा.श्री.चंद्रकांत भाऊ पाटील यांनी सहपरिवार उपस्थित राहुन आरती घेत मनोभावाने दर्शन घेतले तसेच धर्मनाथ बीज निमीत्त सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास उपस्थीती देऊन महाप्रसादाचा आनंद घेतला.



Post a Comment
0 Comments