Type Here to Get Search Results !

मुक्ताईनगर आगाराला १० नव्या एसटी बसेस आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

 मुक्ताईनगर आगाराला १० नव्या एसटी बसेस आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते लोकार्पण 



/////////////// मुक्ताईनगर प्रतिनिधी (संदीप घाईट):-        मुक्ताईनगर आगारामध्ये एसटी बसेस ची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच संत मुक्ताई साहेबांच्या पावन झालेल्या या भूमीत यात्रोत्सव असेल किंवा दर पंधरवाडी एकादशी परिक्रमा व अंतर्धान सोहळा अशा विविध कार्यक्रमांना येणाऱ्या लाखो भाविक भक्त यांची गैरसोय लक्षात घेता आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या २४ वर्षांनंतर महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाकडून नवीन १० एसटी बसेस मुक्ताईनगर आगारात दाखल झाल्या असून. आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या शुभहस्ते बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला.यावेळी शिवसेना उप जिल्हा प्रमुख छोटु भाऊ भोई,भाजप तालुका अध्यक्ष प्रफुल्ल भाऊ जावरे, युवासेना जिल्हा प्रमुख पंकज भाऊ राणे, नितीन कुमार जैन आदीसह शिवसेना युवासेना, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच एसटी महामंडळ आगार प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments