आदिवासी अप्पर आयुक्तावर शिस्तभंगाची कारवाई करा
रोहित झाकर्डे, यांचे दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जनजातीय आयोगाकडे तक्रार
गजानन डाबेराव प्रतीनिधी
अमरावती :- प्रतिनियुक्तीच्या वरिष्ठांच्या आदेशाचे पालन अमरावती अपर आयुक्त करत नसल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी याकरिता राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे कित्येक वर्षांपासून कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत एकीकडे आमदार खासदार मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान सुध्दा पाच वर्षानंतर बदलतो आणि हे अधिकारी एकाच टेबलवर दहा दहा वर्षेपासून कार्यरत आहे काही समाजातील दलाल ठेकेदार लोकांना हाताशी धरून स्वतःचा स्वार्थसाधत आहे सरकारच्या आदिवासी विकासाची धोरणांची प्रभावी पणे अमलबजावणी होत नाही, त्यामुळे प्रकल्प कार्यालय अंतर्गत मोठया प्रमाणात कामकाजात अनियमिता व विपरीत परिणाम होत आहे,प्रतिनियुक्ती वरील कर्मचारी यांची वागणूक भाष अरेरावीची आहे.अनेक आदिवासी विद्यार्थीची पालक लोकांची अप्पर आयुक्त कार्यालय अमरावती व सर्व प्रकल्प कार्यालयात कामानिमित्त अडवणूक करतात योग्य पद्धतीने मार्गदर्शन करत नाही आदिवासी विद्यार्थी यांना आर्थिक भुर्दंड कसा होईल व स्वतःला आर्थिक फायदा कसा होईल याकडे जास्त लक्ष देतात हे सर्व आश्रम शाळेत शिक्षक/शिक्षकतेर कर्मचारी आहेत त्यामुळे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत आहे.अश्या भ्रष्टाचारी अधिकारी /कर्मचारी यांना प्रतिनियुक्ती करण्यात येऊ नये, सदरील कर्मचारी वारंवार आर्थिक गैरमार्ग अवलंबून करून नियम बाह्य बेकायदेशीर प्रतिनियुक्ती घेतात,यांच्या मुळे आदिवासी विकास विभागाची प्रतिमा मलिन होत आहे,श्रीमती नयना गुंडे मॅडम आदिवासी विकास आयुक्त नाशिक यांचे दि ९ सप्टेंबर २०२४ आयुक्त नाशिक यांचे आदेश,आदेश असून सुद्धा आपण ठोस कारवाई कोणती केली नाही त्यामुळे येत्या दहा दिवसांच्या आत वरिष्ठ अधिकारी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार सर्व प्रतिनियुक्तीवर असलेल्या प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना मूळ आस्थापनावर पाठविण्यात यावे असे निवेदन राष्ट्रीय जनजातीय आयोगाचे अध्यक्षकडे तक्रार केस दाखल केली आहे

Post a Comment
0 Comments