खामगांव शासनाणे प्रतीबंदीत केलेला विमल गुटखा पकडला
खामगाव
नांदुरा कडून शहराकडे दुचाकी क्र. एमएच
२८ एटी- ११५७ ने नुरखान बनेखान (वय ५०, रा. हरीफैल। खामगांव) व अमाल जैन (रा. नांदुरा ) हे दोघे काल ४ फेब्रुवारी २५ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास येत असतांना पोलिसांनी पारखेड फाट्यावर थांबविले व झडती घेतली असता पोलिसांना शासनाने प्रतिबंधीत केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक
असलेला विमल गुटखा व सुगंधीत तंबाखु मिळुन आली. त्यांच्या जवळुन गुटखा किं. ४९ हजार ८२८ रू. व दुचाकी क्रं एम एस २८ एटी,११५७,किं. ३० हजार रू. असा एकुण ७९ हजार ८२८ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एसडीपीओ पथकाचे पोहेकॉ. सुधाकर थोरात यांनी ग्रामीण पोस्टेला फिर्याद दिली. फिर्यादीवरून उपरोक्त दोघांविरूध्द कलम १२३, २२३, २७४ २७५ भान्यासं नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment
0 Comments