*35 रक्तदात्यांनी 26 जानेवारीला रक्तदान करून विर जवानांना दिली श्रद्धांजली*
*दिनांक 27/01/2025*
श्रीरामपूर :- आज दिनांक 26जानेवारी 2025 रोजी इंडियन रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूर, महसूल विभाग श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथील पोलीस परेड ग्राउंड वर भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रांतधिकारी व रेड क्रॉस सोसायटी अध्यक्ष श्री. किरण सावंत सा. व तहसीलदार व उपाध्यक्ष रेड क्रॉस सोसायटी श्री. मिलिंदकुमार वाघ यांनी रक्तदान करून मौलाचे पुण्य काम करत रक्तदान शिबिराचे थाटात उदघाटन केले विशेष म्हणजे या शिबिरामध्ये 35 रक्तदात्यांनी स्वयंफुर्तीने शहीद विर जवांनांना श्रद्धांजली आपला रक्तदान करून दिली. या उपक्रमात रक्तदान शिबिरासह गरजु रुग्णांकरीता रक्त लघवी तपासणी शिबीराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर आधार ब्लड बँक संगमनेर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले होते
तसेच यात उपस्थित झालेल्या गरजु रुग्ण लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. शतकवीर 121 वेळेस रक्तदान केलेले रक्तसम्राट नुकताच बिहार राज्यातील दरभंगा या शहरात "राष्ट्रीय सेवारत्न" पुरस्काराने सन्मानित झालेले रक्तसम्राट , साईसेवा & मुठेवाडगाव रक्तदान ग्रुपचे रक्तमित्र आपल्या सर्वांचे परिचित मा.श्री अभयकुमार तेलतुंबडे यांची उपस्थिती होती. रक्तदान क्षेत्रात त्यांनी स्वतः रक्तदान करून शेकडो रुग्णांना वेळेवर जिवनदान दिले. अभयकुमार तेलतुंबडे यांचा सत्कार जंगी करण्यात आला,
या रक्तदान शिबिरासाठी रेड क्रॉस सोसायटी चे सचिव श्री. सुनिलकुमार साळवे तसेच श्री. सुरेश वाघुले, श्री.प्रविण साळवे, श्री.श्रावण भोसले, ब्रदर शेख, श्री.अवधुत, डॉ श्री.संजय दुशिंग,श्री.चंदन सर,श्री.धायगुडे साहेब, निर्मला लांडगे,छाया शिंदे, माया चाबुकस्वार श्री.अरुण कातोरे, शोभा धायगुडे हे रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य या शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments