* राष्टीय महामार्गावर अपघात स्कार्पिओच्या धडकेने ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल*
बुलढाणा : रस्त्याने पायी जाणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्ध इसमाला स्कार्पिओ गाडीने धडक दिल्यामुळे सदर इसमाचा मृत्यू झाला असल्याची घटना ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता च्या सुमारास खामगाव नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक ६ वर असलेल्या प्रिंप्री देशमुख फाट्यावर घडली असून पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बाबत वृत्त असे की खामगाव ते नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर प्रिंप्री देशमुख फाट्यावर रस्त्याने पायी जाणारे पांडुरंग मरीभाऊ वाकोडे वय ८५ वर्ष हे रस्ता ओलांडत असताना त्यांना एम एच २८ बी डब्ल्यू २२०० स्कार्पिओ गाडीच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन वृद्ध इसमाला धडक दिल्यामुळे
त्यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबतची फिर्यात समाधान सावजी गुरचड वय ६४ वर्ष रा. भुसावल यांनी जलंब पोस्टेला दिली यावरून पोलिसांनी स्कार्पिओ गाडी चालक विष्णू खोंड रा. नांदुरा याच्याविरुद्ध अप नं
२८/२०२५ कलम २८१,१०६ ( १ ) BNS अन्वे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका सचिन बावने करित आहे.
Post a Comment
0 Comments