प. पु.सद्गुरू श्री. संत तुळशीराम महाराज यांची 56 वी पुण्यतिथी सोहळा,अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आज महंत ह. भ. प. उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने आज हा सोहळा संपन्न होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली दि
30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी या काळात हा सोहळा पार पडला याच सोहळ्यात पाचव्या दिवशी सकाळी 9-00 ते 2-00 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन व आरोग्य तपासणी व रक्तलघवी तपासणी शिबीर पार पडले, याचे उदघाटन मुकुंदराज संस्थांनाचे मठाधीपाती ह भ प. किसनगिरी जी महाराज, ह. भ. प. विजय महाराज कुहिले यांच्या पार पडले, यावेळी पो. पाटील दत्तात्रय मुठे, सरपंच, सागर मुठे, डॉ. श्री. शंकर मुठे, श्री. बबनराव मुठे, मा. पो. पाटील वसंतराव मुठे, देवस्थान चे अध्यक्ष श्री, भाऊसाहेब मुठे, पत्रकार केशव आसने,शिवाजी पवार व शतकवीर रक्तदाते रक्त सम्राट अभयकुमार तेलतुंबडे, साईसेवा परिवाराचे सतपालसिंग गुड्डू,मनोज मुठे,रामेश्वर मुठे हे उपस्थित होते. आधार ब्लड बँक आणि प्रा. आ. केंद्र. माळवाडगाव, साईसेवा &मुठेवाडगाव रक्तदान परिवार व समस्त ग्रामस्थ मुठेवाडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले यात 32 रक्तदात्यांनी रक्तदान केले 150 हुन अधिक रुग्णांच्या आरोग्य व रक्तलघवी तपासणी करण्यात आली 50 रुग्णाचे आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले यावेळी आधार ब्लड बँकेचे सौ व श्री प्रदीप जाधव व कर्मचारी तसेच माळवाडगाव प्रा आ केंद्राचे डॉ. श्री. पांडुरंग जाधव, डॉ. सौ.प्रीती सैदोरे मॅडम, टेक्निशियन कु.निकिता तेलतुंबडे व आरोग्य केंद्राचे कर्मचारी हजर होते.हा कार्यक्रम सफल होण्यासाठी श्री अभयकुमार तेलतुंबडे यांनी विशेष प्रयत्न केले 🙏🙏

Post a Comment
0 Comments