*संग्रामपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार यांचा पत्रयोगी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित*
*<< केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मंत्रीसह जिल्ह्यातील सर्व आमदार आणी मुंबई येथील अँकर प्रसन्न जोशी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान < { राजु घाटे बुलढाणा} मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्न असलेल्या बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता यांचा आज दि १६ फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री,तथा राज्य कॅबिनेट मंत्री व जिल्ह्यातील सर्व आमदार आणी मुबईचे पत्रकार अँकर प्रसन्नजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संग्रामपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांना पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार केशवरावजी घाटे,आणि रामेश्वर गायकी तसेच वासुदेवराव दमदार या दोन ज्येष्ठ पत्रकारासह संपत्नीक या तिघांचा पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे,मराठी पत्रकार परिषदेची संलग्न असलेल्या बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार परिषदच्या वतीने जिल्ह्यातील ६० वर्षावरील जेष्ठ पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता यांचा पत्रयोगी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम बुलढाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. त्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव,कामगार कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर,आमदार तथा माजी मंत्री डॉ संजय कुटे,आमदार संजय गायकवाड,आमदार मनोज कायंदे, सिद्धार्थ खरात,शिक्षक संघाचे आमदार धीरज लिंगाडे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव विद्याधर महाले,बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक, मुंबईचे अँकर प्रसन्न जोशी तथा विविध पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या पत्रकारांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यामध्ये जेष्ठ पत्रकार यांना शाल,पुष्पहार , सन्मानचिन्ह त्यांची पत्नि यांना साडी व भेटवस्तू देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ह्यावेळी मान्यवर यांनी पत्रकारांचे हिताकरीता मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पदाधिकारी यांनी केले होते. ह्यायावेळी संग्रामपूर जिल्हा मार्गदर्शक पंजाब ठाकरे,तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दांदळे,डाॕ.संतोष लांडे,श्याम देशमुख,राजूभाऊ धर्माधिकारी,शेख रफीक शेख पन्ना,निलेश तायडे,मंगेश सोनोने,स्वप्नील देशमुख,शेख अब्दुल भाई,आदी पत्रकार तथा इतर पदाधिकारी,तसेच सौ.कुसुम गायकी, सौ.शोभा दामधर ,राज्य,विदर्भ व जिल्हा तसेच १३ ही तालुक्यातील अध्यक्ष, सचिव व विविध पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांना सहभोजन देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment
0 Comments