*5% सह थकित दिव्यांग निधी वाटप करण्यात यावा दिव्यांगांची मागणी*
खामगाव (प्रतिनिधी)
खामगाव तालुक्यातील अंबिकापुर येथील दिव्यांग बांधवांनी विराट मल्टिपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष मनोज नगरनाईक प्रहार शहर अध्यक्ष शत्रुघ्न इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा व पंचायत समिती खामगाव गटविकास अधिकारी श्री शेख यांना अंबीकापुर ग्रामपंचायत च्या दिव्यांग निधी मधील अनियमित कारभार बद्दल तक्रारीचे निवेदन सादर करण्यात आले
या तक्रारी मध्ये
सरकारच्या ध्येय धोरणानुसार दरवर्षी पाच टक्के निधी अर्थसहाय्य म्हणून देण्याचे धोरण आहे परंतु ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक संतोष सोळंके यांनी मागील काळातील राहलेला दिव्यांग निधी दिला नाही, निधी नाही असे दरवेळी सांगून ग्रामसेवक संतोष सोळंके हे आज देऊ उद्या देऊ असे मौखिक कळवित होते परंतु आज पर्यंत हा निधी प्राप्त करून दिला नाही संबंधित ग्रामसेवक यांनी वेळ काढूपणा करून नेहमी उद्धट वागणूक देऊन उडवा उडवीची उत्तरे देत त्यांनी आपली बदली करून घेतल्याची माहिती मिळालेचे नमूद केले आहे
तर यापूर्वी असलेले ग्रामसेवक कैलास तेलंग यांनी २०२२-२०२३ मधील आर्थिक वर्षमध्ये पाच टक्के निधी (5%) पैकी अडीच टक्के (2.5%) निधी वाटप केला होता त्यातील उर्वरित (2.5%) निधी सुध्दा आम्हाला मिळाला नाही तो ही देण्यात यावा
तसेच हा निधी परस्पर काढून तो न वितरित करणे म्हणजे शासनाच्या धोरणासह निधीचा अपहार केल्या प्रकरणी आपण चौकशी करत संबंधित ग्रामपंचायत प्रशासन वर गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही दिव्यांग बांधव लोकशाही मार्गाचा अवलंब करीत आंदोलनाचा पवित्रा घेत आपल्या कार्यलय समोर बसणार असल्याचे ही त्यांनी या निवेदन मध्ये म्हंटले आहे यापत्राची दखल घेत येत्या आठ दिवसात या वर योग्य ती कारवाई करण्याची मागणी यामध्ये केली आहे या
निवेदन च्या
प्रतीतिपी
मकरंद पाटील पालकमंत्री बुलढाणा
आकाशदादा फुंडकर कामगार मंत्री तथा आमदार खामगाव
विभागीय आयुक्त अमरावती
जिल्हाधिकारी बुलढाणा
यांना ही पाठविण्यात आल्या आहेत
निवेदन देतेवेळी मनोज नगरनाईक शत्रुघन इंगळे यांच्यासह पद्माकर धुरंधर,वाहिद शबिर खा, सय्यद अशपाक, उमेश खानझोडे, आकाश हिवराळे राजेश म्हात्रे
शेख युसुफ,
मेहृंनिसा दिलावर खा, शेख अहमद शेख शौकत मंदा हिवराळे देविदास घनमोडे चीकाजी कोकाटे श्रेया हिराळे
शेख आशिक शेख हबीब शेख शफिक शेख हबीब शेख नदीम शेख याकूब नामदेव खानझोडे
श्रीकृष्ण हिवराळे राजू हिवराळे प्रल्हाद पोटे शुभम तांदळे करीम खा शानदार खा शेख बशीर शेख हसन वंदना खानझोडे अनिल पवार साक्षी वाघ आदी यावेळी उपस्थित होते
या निवेदन वर योग्य ती कारवाई करून येत्या मंगळवार पर्यंत निधी वितरण करण्यात येईल असे आश्वासन यावेळी पंचायत समिती खामगाव च्या वतीने देण्यात आले
माननीय संपादक वार्ताहर आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रला दिव्यांग हितार्थ प्रसिद्धी देण्याची कृपा करावी
आपला
शेखर तायडे
विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगाव
9371664790


Post a Comment
0 Comments